नवीन लेखन...

गाऱ्हाणी

अशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे. टिव्ही मोबाईल शिवाय कशातच लक्ष देत नाही. नवरा फक्त कमावतो आणि सगळी कामे मलाच करावी लागतात. मुलांना शाळेत किंवा छंदवर्गात नेणे आणणे. बाजारहाट. बिलं भरणे. घरातील नळ लाईट वगैरेची दुरुस्ती करवून घेणे. पालक मिटिंगला जाणे. आणि सुट्टीच्या दिवशी खुशाल दिवसभर झोपून जातो. पै पाहुणे यांच्या येणाऱ्या जाणाऱ्यांची बडदास्त ठेवणे. रुमाल किल्ली पाकिट डबा तयार ठेवणे. आल्या आल्या पाणी चहा देणे बापरे आणि रोजच बाहेरुन आला नवरा की पाणी द्यावे लागते. अगदी जवळ असले तरीही किती मोठी यादी ऐकली. आणि आठवलं की पूर्वी बायका नदीवर किंवा इतर वेळी भेटल्यावर सासू सासरे नंणदा दीर जाऊ यांची गाऱ्हाणी गायच्या आणि विषय वेगवेगळे. पण सूर एकच….

संसार तिचा नवरा तिचा मुलं तिची पण तरीही… असे का व्हावे याचा विचार केला तर समजू शकते की आपल्या घरात मुलगा मुलगी असा भेदभाव करत त्यांची कामे यांची विभागणी याचा पगडा इतका जबरदस्त खोलवर रुजलेले असते की. आणि तीच एक पद्धत पंरपंरा रीतभात या नावाने चालू आहे.अगदी शालेय जीवनात सतत जाणवत असते. मुलीच्या जातीने काय कराव काय करु नये याची सतत जाणिव करुन दिली जाते. आणि तिचा स्वभावच बनून जातो. तहान लागली तरी पाणी तिनेच दिले पाहिजे मग इतर अनेक गोष्टी करणे तर तिचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि आता तर मुलीच्यात पण हेच चालू आहे. जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत थोडे फार करतात. आणि कॉलेज जीवनात तेही करायला वेळ नसतोच. त्यामुळे एका आईलाच हे सगळे करणे क्रमप्राप्त आहे. आपण शिकलो नाही म्हणून ती मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी धडपडत असते. शिवाय घरात जर वृध्द व्यक्ती असतील तर मग काय बोलू शकत नाही. अशा एक खांबी तंबू सांभाळत असतांना जीव दमून जातो. त्यातून ती नोकरी करत असेल तर कठपुतळी व्हावे लागते. आणि समदु:खी मैत्रीण हीच आधार वाटतो आणि गाऱ्हाणी सांगून मनमोकळे केले जातात. आणि मला वाटलेलं आश्चर्य याची उत्तरे मिळाली. पण ही गाऱ्हाणी अगदी शेवटच्या टप्प्यात देखिल चालू असतात. कारण आत्मपरीक्षण करत नाहीत. आपण चुकलो हे मान्य करत नाहीत. उलट आपले वय झाले आहे म्हणून बायकोने सोळा वर्षाच्या मुली सारखे विजेच्या चपळाईने आपली काळजी घेतली पाहिजे असा सूर असतो. बघा जरा हे चित्र बदलण्यासाठी काय करता येईल ते…

सौ कुमुद ढवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..