रात्र येत राहते
दिवस येत राहतो
आपण गृहितच
त्यांना धरत राहतो
असेच महिने येत राहतात
असेच वर्ष जात राहतात
आपण गृहितच
त्याना धरत राहतो
केस पांढरे
अंगावर सुरकुत्या
पाठीत बाक
लटपटणं वगैरे
होत राहते
मग
आपल्याला गृहित
धरत राहतात ते
रात्र दिवस माहे साल
काळाचे घटक येत जात राहतात
……आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी
~ कौशल
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply