बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांना साधत असे. जसा अगदी आगगाडीच्या शिट्टीचा वापर त्यांनी पाकीजा मध्ये कल्पकतेने वापर करून घेतला होता. “चलते चलते” या गाण्याच्या शेवटी, किंवा “मौसम है आशिकाना” गाण्याच्या आधीचा पक्षांचा तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.
ते नौशाद यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर मा.गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती इतकीच काय ती जमेची बाजू. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी त्या पैकी मिर्जा गालिब आणि पाकीझा हे चित्रपट खूप गाजले. पाकीझा चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. त्याची अनेक वेगवेगळी कारणे होती पण या चित्रपटासाठी संगीत दिलेले मा.गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले. या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली तरी या कापलेल्या गाण्यांची HMV कंपनीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. पण मिर्जा गालिब च्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रचंड गुणवत्ता आणि जीव ओतून घेतलेल्या मेहनतीला यशाने दरवेळी दिलेल्या हुलकावणीचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल. पाकिजाचे चित्रपटाचे वास्तविक संगीत मा.गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी मा.गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
गुलाम मोहम्मद यांचे निधन १७ मार्च १९६८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेली काही गाणी.
ये दुनिया है यहां प्यार करना किसको आता है.
किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ.
अखियां मिलाके जरा बात करो जी
जिंदगी देनेवाले सून
मोहब्बत की धून
चल दिया कारवां
शिकायत क्या करू दोनो तरफ गमका फसाना है.
आपसे प्यार हुआ जाता है.
दिल गमसे जल रहा है जले पर धुआँ न हो.
चलते चलते
मौसम है आशिकाना
गुलाम मोहम्मद व लता मंगेशकर भाग १ ते ३
मिर्झा गालीब मधील गाणी.
https://youtu.be/_BJcfx8EiDY
Leave a Reply