गुलाब कशाला मी देवू , उद्याच ते सुकणारे
काव्य गुंफले मी गं, सदाच ते टिकणारे!
भाव चालतो येथे, असली का अपुली प्रिती?
बसले चौकाचौकावर, फुलास ते विकणारे !
येती अनंत अडथळे,त्यांचा मार्ग हा असावा
जाणेच भाग त्यावरुनी,नाहीच ते चुकणारे!
हारलो नाही संपलो,सुरुवात ही तर खरी
कटाक्ष तिरका मारी,उगाच ते जिंकणारे!
नकोच विचार सुडाचा,युध्दाने वाढते युध्द
लावूच नये ते बीज, नाहीच जे पिकणारे !
लेखकाचे नाव :
shrikant petkar
लेखकाचा ई-मेल :
shrikantpetkar@yahoo.com
Leave a Reply