गुंतू नकोस, प्रीतीत वेडया जीवा
निस्वार्थी! नूरली प्रीती ही मानवा ।।धृ।।
वनांतरी सीता, सुख त्यागी रघुराजा
हनुमंत दावी, हृदयीचे रूप रघुराया
रक्ताळला हरि, काटे बोचता सुदामा
पांचालीची, लज्जा राखे मुरलीवाला
भाव भक्तीप्रीतीचा हा कुणा सांगावा ।।१।।
अर्थ प्रीतीचा अर्थ! अर्थची रे गुणवत्ता
नटली प्रीती नाटकी, बेगडी हसूं आता
औपचारिक, पोकळ प्रीतीभाव आता
नका दुःख ते सांगु, सुख तेवढेच सांगा
निष्पाप! भाव प्रितीचा कसा जाणावा ।।२।।
जोवरी शिजती शिते, तोवरी येती भुते
यौवनी, दाटते मिठी, वृद्धत्वे रे दुरावा
नसता माया,नसे माया, रुक्ष जिव्हाळा
प्रीत, सारी विखुरलेली मृगजळी आता
निष्प्राण प्रीतीत, काय सुखदा मानवा ।।३।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७.
७ – १ – २०२२.
Leave a Reply