धर्म या शब्दाला आता अनेक अर्थ प्राप्त झाले असले तरी पूर्वी धर्म म्हणजे नीतीने वागणे, धर्म म्हणजे आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांची प्रामाणिक पूर्तता याच अर्थाने हा शब्द प्रचलित होता. क्षत्रिय धर्म, ब्राह्यण धर्म, वैश्य धर्म आदी शब्दप्रयोग जातीवाचक नव्हे तर गुणवाचक होते. समाजाचे संरक्षण करायचा तो क्षत्रिय आणि समाजाचे संरक्षण हा त्याचा क्षत्रिय धर्म, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणारा ब्राह्यण धर्माचे पालन करायचा, तर व्यापारउदीमातून अर्थार्जन करणारा वैश्य धर्माचे पालन करायचा. कालांतराने ब्राह्यणाचा मुलगा ब्राह्यण धर्माचे किंवा क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय धर्माचे पालन करू लागला, तशी परंपराच निर्माण झाली आणि त्यातून मग जातीसंस्था उदयाला आल्या, तो सगळा नंतरचा इतिहास. सांगायचे तात्पर्य त्या काळात सामाजिक कर्तव्यांना धर्माचे स्थान दिलेले असायचे आणि ते त्या श्रद्धेनेच पार पाडले जायचे. मातृ ऋण, पितृ ऋण, समाज ऋण अशा ऋणातून मुत्त* होणे जीवनाची इतिकर्तव्यता समजली जायची. आपल्याला काय मिळते किंवा मिळायला हवे हा विचारच नसायचा, आपण काय देऊ शकतो याचीच चिंता वाहिली जायची. आता सगळेच काही बदलले आहे. धर्म या शब्दाचा अर्थही आता दूषित झाला आहे आणि त्यासोबत दूषित झाल्या आहेत त्या अर्थामागच्या जाणिवा. आता अर्थ हाच लोकांसाठी धर्म झाला आहे. पैसा, भौतिक सुखे, चंगळवाद या पलीकडे कुणी फारसा विचार करीत नाही. देशाचा, समाजाचा वगैरे विचार करणाऱ्यास वेड्यात काढले जाते किंवा तसा विचार कुणी करीत असेल तर त्यात त्याचा काही स्वार्थ असला पाहिजे, असे समजले जाते. एखाद्याला भेटणारी शंभरातली नव्वद माणसे लबाडच भेटली तर त्याने उरलेल्या दहा माणसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा, हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यात परीक्षा त्या नव्वद लोकांची नसतेच. त्यांनी के
्हाच कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेले असल्याने त्यांना
काही काळजी करण्याचे कारण नसते.
खरी परीक्षा असते त्या उरलेल्या दहा जणांची. नव्वद लबाडांमध्ये आपले सत्त्व कायम ठेवण्याचे जिकरीचे काम त्यांना करावे लागते. खरा कस त्यांचा लागतो. पूर्वी हे प्रमाण उलट होते. शंभरातला एखादाच लबाड असायचा, त्यामुळे अपराध ही अपवादात्मक बाब असायची. आपापल्या धर्माचे, म्हणजेच आपल्या निहित कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करण्याकडे लोकांचा कल असायचा आणि त्यातच त्यांना प्रचंड समाधान मिळायचे. पूर्वीच्या गुरुजींना वेतन आयोग लागू झाला किंवा नाही, वेतन वाढले किंवा नाही याची काळजी नसायची कारण त्यांचे समाधान त्यात नसायचे. त्यांचा खरा आनंद त्यांच्या शिष्याच्या पराक्रमात दडलेला असायचा. मुळात वेतन वगैरे प्रकारच नव्हता. ज्या लोकांकडे ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांना आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्यांच्या पोटापाण्याची, निवासाची व्यवस्था गावातले लोक करायचे. ब्राह्यणाला दान देणे, या पुढे विकृत झालेल्या कल्पनेचे मूळ यात आहे. ब्राह्यणाला केवळ ज्ञानार्जन आणि ज्ञानदान एवढेच काम असायचे, आणि ज्ञान अनमोल असल्यामुळे त्याला दाम देणे किंवा त्याचे मोल करणे किंवा ते पगारी सेवकाकडून घेणे वगैरे विषयच नव्हता तर ते गुरुदक्षिणेत घेतले जायचे. त्याचमुळे गुरू आणि त्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी गावकरी सामूहिकपणे पार पाडायचे. त्या काळी सगळेच लोक आपापल्या धर्माचे निष्ठेने पालन करायचे, ब्राह्यणही त्याला अपवाद नव्हते. या मंडळीचा उदरनिर्वाह इतरांच्या कृपेवरच अवलंबून असल्यामुळे सांपत्तिक स्थितीच्या बाबतीत ब्राह्यण वर्ग किंवा गुरुजन वर्ग यथातथाच असायचा. गरीब बिचारे मास्तर, हे त्यांचे वर्णन त्यांच्या स्वभावासोबतच त्यांच्या
ांपत्तिक स्थितीचे दर्शन घडविणारे होते. अगदी गेल्या पिढीपर्यंत समाजातील मास्तर हा वर्ग, त्यांच्या ‘गरीब बिचारे’ या वर्णनाला प्रामाणिकपणे जागत होता. किरकोळ वेतन, अतिसामान्य परिस्थिती आणि त्यातही श्रीमंतीपेक्षा पोरांचे आयुष्य घडविण्याचा ध्यास! खरे समाधान आपला विद्यार्थी मोठा अधिकारी झाला, नेता झाला, समाजकारणी झाला यातच मानले जायचे. आजवर जगात जेवढ्या काही क्रांत्या झाल्या, उठाव झाले त्यांचे बीज विचाररूपाने क्रांतिकारकांच्या मनात रूजविण्याचे काम त्या त्या वेळेच्या गुरुजनांनीच केले. समाजाला, देशाला वैचारिक दिशा देण्याची मोठी जबाबदारी गुरुजन वर्गाने इमानाने पार पाडली. परंतु ज्ञानदानाच्या धर्माचे पालन करणे यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानणारी मास्तरांची पिढी दोन पिढ्यांपूर्वी अस्तंगत झाली. आता सगळीकडे ‘सर’ लोकांचे पीक आले आहे. मास्तर किंवा गुरुजींचे हे उत्क्रांत रूप अनेक अर्थाने वेगळे आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला असेल तर तो हाच की पूर्वीचे मास्तर आपल्या धर्मात आपल्या जीवनाचा अर्थ शोधत, आताचे ‘सर’ अर्थामध्ये आपला धर्म शोधतात. निष्ठा बदलल्या, निष्ठांची मापदंडे बदलली. श्रेष्ठ, कनिष्ठ या पातळ्या ज्ञानापेक्षा, वकुबापेक्षा किंवा लायकीपेक्षा इतर घटकांवर ठरू लागल्या. अर्थात कोणतेही सत्य सांगताना त्याला अपवाद असतात हे गृहीत धरलेलेच असते. हा अपवाद इथेही आहेच. आजही उद्याची पिढी घडविण्याची जबाबदारी ओळखून कोणतीही अपेक्षा न करता निरलसपणे आपल्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे शिक्षक आहेत, परंतु ते अपवादानेच. गर्दी आहे ती मुलांच्या गुणवत्तेपेक्षा आपल्या पगारवाढीची चिंता करणाऱ्यांची. मास्तर आता कोणत्याच अर्थाने गरीब राहिलेले नाहीत. सरकारकृपेने मुबलक प्रमाणात अर्थार्जन होत आहे. कामाचा व गुणवत्तेचा आणि वेतनाचा अर्थाअर्थी काहीह
ी संबंध नाही, हा नियम जसा इतर सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे तसाच तो शिक्षकांनाही लागू आहे. त्यांची योग्यता, कर्तव्याप्रती त्यांची निष्ठा आणि त्यांच्यावर सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चाचा समाजाला मिळत असलेला मोबदला तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. अशी यंत्रणा कधी उभी होणार नाही, उभी होऊ दिली जाणार नाही. दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या आणि क्वचितप्रसंगी पदवीधर असलेल्या मुलांनाही साधा नोकरीचा अर्ज नीट लिहिता येत नसला तरी तुम्ही काय शिकलात किंवा तुम्हाला काय शिकवले, हे विचारण्याची
कुणाचीच टाप नाही. आज परिस्थिती अशी आहे की ज्या
शाळा सरकारी अनुदानावर चालत नाही, शिक्षकांच्या वेतनावर संस्था आपल्या खिशातून खर्च करते, त्या शाळांचा दर्जा सरकारी शाळांपेक्षा लाखपटीने अधिक चांगला आहे. त्या शाळांमधील शिक्षकांना सरकारी शाळांतील शिक्षकांच्या तुलनेत निम्मेही वेतन मिळत नाही; परंतु त्यांना जाब विचारणारे दक्ष संस्थाचालक असल्यामुळे कामात कुचराई होत नाही. महिन्याला दोन-चार हजार हातावर पडणारे तेही शिक्षकच असतात आणि महिन्याला दोन-चार हजार केवळ ‘अप-डाऊन’वर खर्च करणारे हेही शिक्षकच असतात; परंतु त्यांच्या कामाच्या दर्जात किती अंतर असते! आज ठाामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आढळतो तो याच कारणामुळे. आपण शाळेत शिकविले किंवा नाही शिकविले तरी आपल्याला कुणी जाब विचारणारा नाही, काहीही झाले तरी महिन्याच्या पहिल्या तारखेला आपले पासबुक श्रीमंत होणारच, याची खात्री असल्यामुळे केवळ ‘टाईमपास’ करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. फारच काही झाले तर बदलीपेक्षा अधिक मोठी कारवाई होणार नाही आणि थोडेफार देणेघेणे केले तर तीही रद्द होऊ शकते, हे माहीत असल्याने कुणीही ‘टेन्शन’ घेत नाही. कामाचे ‘टेन्शन’ न घेणाऱ्या या शिक्षकांनी कैक पिढ्या बरबाद केल्या आहेत. ठाामीण भाग
तील शंभरपैकी फार तर दोन मुले उच्च शिक्षण घेताना दिसतात. इतर सगळेच सुशिक्षित बेरोजगारांच्या फौजेत दाखल होतात. पूर्वी परिस्थिती याच्या अगदीच उलट होती. आताच्या विद्यार्थ्यांना सुशिक्षित असल्याचा शिक्का कपाळावर बसल्याने शेतात कष्ट करायची लाज वाटते आणि जे काही शिकले आहे त्याला दर्जाच नसल्याने कुणी नोकरीसाठी उभेही करीत नाही, अशी काहीशी त्यांची अवस्था झालेली असते. त्यांची ही अवस्था त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्या, परंतु बिघडविणाऱ्या हातांनी केलेली असते. दुर्दैव हेच की याचा जाब कुणी विचारत नाही. वेतन आयोगासाठी सरकारला वेठीस धरणाऱ्या, वेतन आयोग मिळाल्यावरही महागाई भत्त्यासाठी रूसून बसलेल्या या मंडळींना कुणी हे का विचारत नाही की तुमच्या शंभर विद्यार्थ्यांपैकी केवळ दोनच विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लायक कसे ठरतात? बोर्डाच्या परीक्षा इमानदारीने घेतल्या तर बोर्डाचा निकाल 35 टक्क्यांपेक्षा अधिक का लागत नाही? सरकार तुमच्यावर एवढा खर्च करते, त्या बदल्यात तुम्ही सरकारला, समाजाला काय देता? हे विचारण्याचे धाडस कुणी केलेच तर तो चारही बाजूंनी ठोकल्या जाईल. या लोकांच्या बौद्धिक दहशतवादापुढे दस्तुरखुद सरकारच गुडघे टेकत असेल, तर सर्वसामान्यांची काय कथा? यापुढे जर गावागावांमध्ये शिक्षकांच्या घरावर जर दरोडे पडले तर आश्चर्य वाटून घेऊ नये. कारण संपूर्ण गावात जर नवरा-बायको दोघेही घरात नोकरीला असतील तर ठरावीक तारखेला किमान एक लाख रुपये तरी या घरात नक्कीच असतील, या आशेने गावातील भुकेकंगाल यांची घरे नक्कीच लुटतील. नुकताच डॉक्टरांवर हल्ला झाला तर आजामीनपात्र गुन्हा ठरविला गेलाच त्यानंतर आता शिक्षकांकरिताही कायदा करावा लागणार आणि पोलिसांचे संरक्षणही पुरवावे लागणार हे निश्चित.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply