हिंदू धर्मात गुरुला देवाचा दर्जा दिला जातो. कारण गुरु आपल्या शिष्यांना नवजीवन प्रदान करतो आणि त्यांना ज्ञानी बनवतो. गुरुचे महत्त्व समजून घेण्यासाठी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.
गुरु शब्दा मध्येच गुरुच्या महिमेचे वर्णन आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजेच गुरुचा अर्थ होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा.
गुरु शिष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी जो गुरुचा आशिर्वाद घेतो, त्याचे जीवन यशस्वी होते. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे. ”महर्षी व्यास” हे आद्य गुरु मानले जातात. महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. ही शक्ती गुरु पोर्णिमा च्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गुरु पोर्णिमाच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते.
महर्षि वेद व्यासने भविष्योत्तर पुराणांमध्ये गुरु पौर्णिमेविषयी लिहिले आहे.
मम जन्मदिने सम्यक् पूजनीय: प्रयत्नत:।
आषाढ़ शुक्ल पक्षेतु पूर्णिमायां गुरौ तथा।।
पूजनीयो विशेषण वस्त्राभरणधेनुभि:।
फलपुष्पादिना सम्यगरत्नकांचन भोजनै:।।
दक्षिणाभि: सुपुष्टाभिर्मत्स्वरूप प्रपूजयेत।
एवं कृते त्वया विप्र मत्स्वरूपस्य दर्शनम्।।
अर्थ – आषाढ शुक्ल पोर्णिमा माझा जन्म दिवस आहे. याला गुरु पोर्णिमा म्हणतात. या दिवशी पुर्ण श्रध्देने गुरुला कपडे, आभूषण, गाय, फळ, फूल, रत्न, धन इत्याची समर्पित करुन पूजन करावे. असे केल्याने तुमच्या गुरुमध्ये तुम्हाला माझ्या रुपाचे दर्शन होते.
— संजीव_वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply