नवीन लेखन...

सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन कमी करायला मदत करते

आपल्या आरोग्यावर आपण रोजच्यारोज घेत असलेल्या आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत अनेक सल्ले आपल्याला मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते आणि ह्यावरूनच तुमचे आरोग्य कसे असेल ते ठरते.

आजकालच्या धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनात खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या वेळा मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत. याचा साहजिकच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पूर्वीच्या काळी सूर्यास्तापूर्वी आहार करण्याचा नियम असे. हेच पूर्वीच्या लोकांच्या दीर्घायुषी आणि निरोगी आरोग्याचं गुपित असावं असं म्हटलं जातं. मग खरंच सूर्यास्तापूर्वी  जेवण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं का ते पुन्हा एकदा जाणून घेऊयात.

# रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी घेतल्याने ते पचायला खूप सोपे जाते. तसेच शरीरात कॅलरीज बर्न होण्यास शरीरातील यंत्रणांना अधिक वेळ मिळतो. रात्रीच्या वेळेस पचायला हलकं, कमी कॅलरीज असणारे पदार्थ खाण्यासाठी निवडा.

# रात्री ९ च्यानंतर भरपेट जेवणाची सवय असेल तेर ते जाणीवपूर्वक टाळा. कारण रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्थेचं कार्य बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम झोपेवरही होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवयही टाळा. यामुळे रात्री-अपरात्री वॉशरूमला जावं लागून तुमची झोपमोड होऊ शकते.

# संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय तुम्ही यशस्वीरित्या आजमावली तरीही अनेकदा रात्री भूक लागू शकते. अशा वेळेस आहारात कशाचा समावेश कराल? याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा ज्यामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास जास्तीतजास्त मदत होईल.

अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारात लहानसहान बदल करतात. त्यामुळे योग्य आहारतज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या जीवनशैलीनुसार आहार आणि त्याच्या वेळा निश्चित करा जेणेकरून तुम्हीसुद्धा एक हेल्दी आयुष्य जगू शकाल.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..