।। सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामि।।
अगस्त्याचे ७-१० सेंमी उंचीचे अल्पायूषि व लवकर वाढणारा वृक्ष असतो.काण्ड सरळ व विरळ फांद्याचे असते.पाने १५-३० सेंमी लांब असतात व त्यास ४१-६१ पत्रके असतात.फुल पांढरे,नौकाकार,मंजिरी स्वरूपात असते.फळ ३० सेंमी लांब वाकडे असते व त्यात १५-२०बिया असलेली शेंग असते.
ह्याचे उपयुक्त अंग पंचांग असून हा चवीला कडू,व थंड गुणाचा असतो व गुणाने हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे उपयोग पाहुयात:
१)अगस्त्याची त्वचा व पाने जखमेवर लावायला व सुजेवर उपयुक्त आहेत.
२)अगस्त्याच्या पानांची व फुलांची भाजी कृमीमध्ये उपयुक्त अाहे.
३)अगस्त्याचा सालीचा रस हा कफमोकळा करतो म्हणून ह्याचा उपयोग सर्दी,खोकला ह्यात होतो.
४)अगस्त्याच्या फुलांचा उपयोग स्त्रीयांच्या अंगावर पांढरे जाणे ह्या आजारावर होतो.
५)अगस्त्याचे पिकलेले फळ हे मेध्य आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
नमस्कार.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
मी आपली मिहितीही वाचली. अनेक समाजिक उपक्रमांमध्ये आपण भाग घेतां, स्तुत्य आहे.
– माझी शंका अशी आहे की या झाडाला अगस्त्य कां म्हणतात ? कारण अगस्त्य म्हणजे अगस्ति ऋषींच्या कुलातील/ वंशातील व्यक्ती. हादग्याचा ‘शोध’ अगस्ति यांनी लावला अशी कांहीं आख्यायिका आाहे काय ?
– अशीच पुरातनकालीन ऋषी / श्रेष्ठ व्यक्ती / जनसमूह वगैरेंपासून कांहीं वृक्ष / वनस्पतींची नांवें निर्माण झाली आहेत काय ? मला दोनएक सुचतात.
– देवदार. यातील देव म्हणजे ईश्वर असा अर्थ नसून ऋग्वेदीय काळात जो देव नामक जनसूह होता ( व ज्याचें असुरांशी वैर होतें), त्याचा इथें संदर्भ असावा.
– मात्र सूर्यफूल मधील सूर्य हा एक star अशा अर्थानें असावा, ऋग्वेदीय काळातील ‘मित्र’ या देवतेशी त्याचा संबंध असावा असें वाटत नाहीं. बहुतेक करून सूर्यफूल हा शब्द sunflower चें भाषांतर असावें.
स्नेहादरपूर्वक,