केशप्रभा – केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रभावी गोळ्या
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, आहार, विहार व औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून अक्षय उद्योग समूहाने ‘केशप्रभा’ नावाचे एक अभिनव उत्पादन वटी स्वरुपात सादर केले आहे. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता देण्याचा प्रयत्नही केला आहे. केसांच्या स्वास्थ्यासाठी केशप्रभा गोळ्यांमधील प्रत्येक औषधी कशी कार्य करते ते आता पाहूया.
प्रत्येक विलेपित गोळीतील घटक द्रव्य व प्रमाण
कृष्णसारिवा, माका प्रत्येकी ८० मिलिग्रॅम, ब्राह्मी, गुडुची प्रत्येकी ७० मिलिग्रॅम, गोखरू, शतावरी, वटजटा प्रत्येकी ६० मिलिग्रॅम, सुवर्णमाक्षिक भस्म, मौक्तिक पिष्टी प्रत्येकी ३० मिलिग्रॅम; भावना वटजटा क्वाथ.
कृष्णसारिवा : शारीरिक पेशींच्या जडणघडण प्रक्रियेत काही विषारी घटक सतत उत्पन्न होत असतात. त्यांना काबूत ठेवण्यासाठी शरीर आपणहून प्रयत्नशील असते. तरीदेखील सदोष आहार, उग्र रासायनिक घटकांचा संपर्क, चुकीची जीवनशैली अशा कारणांमुळे चयापचयातून अतिरिक्त विषारी घटक निर्माण होतात. ह्यांना पेशीविघातक (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. ह्या फ्री रॅडिकल्समुळे केसांच्या स्वास्थ्यावर घातक परिणाम होतात, केस झपाट्याने गळू लागतात, पांढरे होतात. कृष्णसारिवा वनस्पतीमध्ये फिनाइलप्रोपेनॉइड नामक पेशीरक्षक घटक असतो. हा घटक फ्री रॅडिकल्सना उत्तमप्रकारे काबूत ठेवून केस गळणे थांबवतो.
माका : केसांसाठी निर्मित उत्पादनात ही वनस्पती आवर्जून असतेच. माक्याचे केशवर्धक गुण विविध संशोधातून सिद्ध झाले आहेत. ह्याचा उपयोग बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे होतो. दोन्ही प्रकारात ह्यातील घटक रक्तात शोषले जाऊन केशवर्धनाचे अपेक्षित कार्य करतात.
गुडुची : केसांच्या स्वास्थ्यासाठी गुडुची विविध प्रकारे उपयुक्त ठरते. रसायन असल्यामुळे शरीराच्या सर्वच धातूंना बळ देते. यकृताचे कार्य उत्तम राखण्यामुळे बाकीच्या अन्तःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण राखून हॉर्मोन्सचे संतुलन उत्तम राहते. हॉर्मोन्सचा संबंध केसांच्या स्वास्थ्यासाठी सर्वमान्य आहेच. सीबम हा त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे. केसांचे पोषणही त्वचेच्या माध्यमातूनच होत असल्याने गुडुचीचे गुण केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात. गुडुची ही अस्थि पोषणासाठी एक उत्तम वनस्पती आहे. अस्थिधातूचा केसांशी असलेला संबंध लक्षात घेता गुडुचीचा उपयोग अस्थिपोषणासाठी व परिणामी केसांच्या स्वास्थ्यासाठी सिद्ध होतो. फंगसच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने केसातील कोंड्यासाठी देखील ह्याचा विशेष उपयोग होतो.
गोखरु : केसांच्या व त्वचेच्या काळ्या रंगासाठी कारणीभूत असणारे रंजकद्रव्य म्हणजे मेलॅनिन. गोखरु सेवनाने मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (MSH) प्रेरित होते. शिवाय त्याने मेलॅनिन निर्मिती, त्वचेमध्ये पसरण्याची क्रिया व सुप्त मिलॅनोसाईट कोशिकांवर उत्तेजक क्रिया होते. केसांच्या कृष्ण वर्णासाठी ह्याच्या सेवनाने उत्तम लाभ होतो.
शतावरी : इस्ट्रोजिन नामक हॉर्मोनचे संतुलन बिघडले तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. मासिक रजःस्राव नियमित होणे हे इस्ट्रोजिनचे संतुलन योग्य असल्याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रियांमध्ये रजःस्राव अनियमित असतो त्यांना केसांचे विकार अधिक संभवतात. शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजिन्स असल्याने रजःस्रावाचे संतुलन राखले जाते व केस गळणे आटोक्यात राहते. पुरुषांमध्ये अल्प प्रमाणात असलेले इस्ट्रोजिनचे प्रमाण वाढले तर टेस्टोस्टेरॉन घटू शकते. शतावरीमुळे इस्ट्रोजिन्सचे संतुलन चोख राहते व पुरुष असो वा स्त्रिया, दोघांच्याही केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते.
वटजटा : वडाच्या पारंब्यांचा उपयोग केसाच्या वाढीसाठी होतो. प्राप्त निष्कर्षानुसार केसांची जाडी ३१ % वाढते, १५ % नवीन केसांची निर्मिती होते तर संख्या सुमारे ४६ % वाढते.
सुवर्णमाक्षिक भस्म : रस – रक्त – मांस – मेद – अस्थि – मज्जा व शुक्र असे सात धातु शरीराच्या धारणासाठी निसर्गाने निर्माण केले आहेत. सुयोग्य पोषण मिळाले तर सर्व धातु, उपधातु आणि मल सुदृढ राहतात. रक्त धातुमधील लोहाचे प्रमाण उत्तम राखण्याचे कार्य सुवर्णमाक्षिक भस्मामुळे होते. अर्थात पुढे त्यापासून निर्माण होणारे धातु-उपधातु सुस्थितीत राहून केस झडण्याची शक्यता कमी होते.
मौक्तिक पिष्टी : अस्थि धातूचे परिपूर्ण पोषण करणारे सागराच्या कुशीतून निर्माण होणारे हे द्रव्य आहे. मौक्तिक म्हणजे मोती. ह्यामध्ये ८२ ते ८६ % एवढ्या मोठ्या मात्रेत कॅल्शियम आढळते. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी १० % कॅल्शियम हे रक्त संवाहनात असते तर ९० % अस्थिधातुमध्ये असते. म्हणून अस्थि पोषणासाठी कॅल्शियमची गरज सर्वात अधिक असते. निसर्गनिर्मित मोत्यांमध्ये असलेले कॅल्शियम उत्तम दर्जाचे असून मानवी शरीरात सहज शोषले जाते. अस्थींच्या पोषणाने अर्थातच केसांचे स्वास्थ्य उत्तम राहून हाडांनाही बळकटी मिळते.
ब्राह्मी : मानसिक ताण, चिंता, भय अशा कारणांमुळे केसांचे विकार संभवतात. ह्या गोष्टींमुळे कॉर्टिकोस्टिरॉन आणि नॉरअॅड्रिनलीन नावाची हॉर्मोन्स वाढून केसांची गळती सुरु होते. ब्राह्मी सेवनाने कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन नियंत्रणात राहून केसांची गळती रोकण्यास हातभार लागतो. केस गळण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड मधील T4 जातीच्या स्रावांची कमतरता हेदेखील महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी सेवनाने ह्या T4 स्रावांची हळुवार वाढ होते व केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्राव जरुरीपेक्षा अधिक वाढत नाहीत, फक्त योग्य मात्रेत वाढ होईपर्यंतच ह्याची क्रिया घडते.
केशप्रभा सेवन करण्याची पद्धत
२ – २ गोळ्या दिवसातून दोन वेळा, सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपतांना.
वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
फोन – +917208777773
Email: drjalukar@akshaypharma.com
Age 36
केस खूप गळतात
कोणतीही औषधे चालू नाहीत
कोणताही आजार नाही
कोंडा होतो खूप