हक्क तुझा,हक्क माझा,
हक्क याचा अन त्याचाही…..
पण मला एक सांगा…..
हक्क कधी हक्काचा आहे का हो…?
एकदा आसच चालत आसतांनी….
रस्त्यानं…..!
अविरत पहात व्हतो….
वेगवेगळे रूपं….
ना निरगुण न ही निराकार….
ते तं होते,
आंकुचित….,
अन संकुचितही…..!
व्याख्याच बदलली व्हती
हक्कानं आपली….
सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
फाईल करप्ट व्हावी
तसा करप्ट झालता हक्क….!
अन मंग काय,
हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली…….
आपल्याच
हक्काची……!!!
स्वतःचीच……
स्वतःसाठी
हक्कानं चालवलेली…..!
हक्कालं वावडं व्हतं….
गरीबाच्या घामाच,
भटक्याच्या पालाचं,
श्रमिकाच्या झोपडीचं
अन विद्रोहाच्या चोपडीचं…!!!
हक्क पोचलाच नाही कधी
रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी…..
ना पालात,ना रानात,
नाही झोपडीत…..!
तो तं…..
आरामात राबतोय……
संस्थानिकांच्या महालातं…..
हक्कानं….!!!
©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
9405807079
Leave a Reply