नवीन लेखन...

हल्ल्यामध्ये सुध्दा विकीलीक्स आपल्याला इंटरनेटवर सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात

लंडन : सर्वत्र इंटरनेटवर जरी विकीलीक्सची अमेरिकन सरकार आणि हॅकर्स द्वारे कोंडी केली जात असली, तरी सुध्दा ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न विकीलीक्स करीत आहे. विकीलीक्सला त्यांच्या वेबसाईटचे नाव बदलण्यासाठी भाग पाडण्यात येत आहे. विकीलीक्सचे जगभरामध्ये जवळ जवळ ३ लाख चाहते आहेत. विकीलीक्सचा निर्माता आहे जुलियन अस्संगे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे. अस्संगे म्हणतात, “त्याला जरी पकडण्यात आले तरी सुध्दा अमेरिकन डिप्लोमेटिक केबलस् जगातील निरनिराळ्या वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जातील.”

शेकडो केबल्स ह्या आठवड्यामध्ये विकीलीक्स्ने जगजाहीर केलेली आहेत. काही वर्तमानपत्रांद्वारे तर काही त्यांच्या हजारो सभासदांद्वारा. इतकेच नाही तर ही एनक्रीप्ट केलेली केबलस्, जर काही त्याला झालेच तर डीक्रिप्ट करण्यासाठी पासवर्ड रिलीज केला जाईल आणि जे गुढ बंद करून ठेवलेले आहे, ते एकाच वेळेला सगळीकडे उघड केले जाईल, असे अस्संगेने गार्डियन वर्तमान पत्राच्या वाचकांबरोबर वेब चॅट करताना सांगितले आहे.

विकीलीक्स गुप्त माहिती उघड करण्यासाठी संपूर्णतया वेबसाईटवर अवलंबून नसून, ही राष्ट्र नसलेली अशी संस्था आपल्या मेडिया पार्टनरांबरोबर सरळ सरळ संधान साधू शकते आणि त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्या निनावी मदतगारांच्या मदतीने त्यांच्याकडे असलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपुढे नेण्याचा प्रयत्न करु शकते.

गार्डीयनच्या वाचकांबरोबर शुक्रवारी ऑन लाईन चॅट करताना अस्सेंगे म्हणतात, त्यांची वेबसाईट लवकरात लवकर सुरु होईल. माझे साडेतीन वर्ष केलेले काम आणि इतर गोष्टी सहजा सहजी लोकांसमोर येत नसल्यामुळे मला दुख: होत आहे.

एवरी डी एन एस ही मेंचेस्टर, न्यू हेम्प्शायर स्थित कम्पनी जी विकीलीक्स साठी जनतेची वाहतूक पाठवीत होती, तिनेच गुरुवारी सायबर हल्ल्याच्या भीतीने त्यांचे नेटवर्क कोसळून पडू नये म्हणून, ते काम करण्याचे थांबविलेले आहे.

संदर्भ : एम एस एन

— मयुर तोंडवळकर

Published on : 4 December 2010

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..