हळव्या अबोल मनाचे
चांदणे ते निरागस
रात्रीस होतात अनेक
भास आत खोलवर..
तुटतो तारा आकाशातून
हलकेच मग एक
मन कुणाचे मोडते
न कळे काही कुणास..
क्लेश मनास खोलवर
अनेकदा अबोल होता
मोह होतो अलगद मग
नकळत मनात तेव्हा..
कुणी आनंदी हसरे
सुखी आयुष्यात असता
कुणाची कथा तुटत्या
ताऱ्यासारखी आल्हाद विखुरता..
नकोच कुठला अंतरी
लोभ, मोह, माया
होतात मनास दुःखद
अतीव गहिऱ्या यातना..
एक तारा तो चमचमता
आकाशी अलगद हरवतो
माणुसकीच्या अलोट गर्दीत
भावनेचा अंत दुःखद होतो..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply