हळव्या होतात भावना
तेव्हाच मनाला मोह होतो रे,
साद नसेल तुझी काही
तरी भावनेचा बहर खुलतो रे..
मोकळी वाट अनामिक
तुझा अंतरी भास होतो रे,
न भेट मुग्ध तुझी होणार कधी
मन स्पर्शी तुझा भास मोहरतो रे..
दरवळे मोगरा गंधित
फुलं इवले ते नाजूक रे,
तुझ्या शब्दांचे चांदणे
सख्या तुझ्यात मी गंधाळून रे..
आल्हाद रवी अस्तास जातो
कातरवेळ ती काहूर मनी रे,
गुंतले भाव नाजूक तुझ्यात
हृदयात तू हलकेच बंदिस्त रे..
कातरेवळ सरते जरा
चांद रात्री आकाश सजले रे,
घे मिठीत अलवार मजला
लाजते मी तेव्हा तुझ्या बाहुत रे..
किती मनोहर धुंद चित्र हे
स्वप्न हे एक आभास रे,
न तू भेटशी कधी मला
वेडे वाटे तुला हे मोह जाल रे..
भाव गुलाबी क्षण सोनेरी,
मी दूर दूर लांब जाई रे,
एक वेडी अबोध बावरी मी
हृदय अंतरी अबोल मी रे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply