नवीन लेखन...

हानाबी (जपान वारी)

मागच्या भागात आपण साकुरा अनुभवताना ‘हानामी’ असा शब्द आला होता.
आता हा ‘हानाबी’; काय आहे बरं हे?

ती पण फुले च मानूया! हानाबी म्हणजे आकाशात उधळलेली रंगीबेरंगी चमचमती फुले जी ते काळेभोर आकाश चांदण्याच्या बरोबरीने व्यापून टाकतात.

हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी!
ओबोन फेस्टिवल (जपानचा पितृपंधरवडा) च्या आसपास,  जुलै ते ऑगस्ट पर्यंत सर्व जपानमध्ये हे आतिषबाजीचे कार्यक्रम होतात. ह्याचा मूळ हेतू दुष्ट आत्म्यांना आणि भुतप्रेतांना दूर करणे हा आहे असे म्हणतात.

हा हानाबी फेस्टिवल जपानच्या समर सिझनचा एक अविभाज्य भाग आहे. उन्हाळ्यामध्ये इथे अतिशय उकाडा असल्याने घराबाहेर पडणे आणि उत्साहाने काही करणे बऱ्याचवेळा अगदी अशक्य होऊन जाते.

दिवसा तर अगदी विचारायला नको! आपल्या कडे विदर्भ मराठवाड्यामध्ये जसा उष्णतेचा पारा वर चढत जातो तसाच काहीसा जपानच्या उन्हाळ्यात.
अशा वेळी काय बरं करणार? असा प्रश्न पडला असावा बहुतेक इथल्या पूर्वजांना आणि हानाबीची युक्ती काढली असेल त्यांनी… मजेचा भाग सोडला तर हेच खरे कारण असेल का ह्या फेस्टिवलचे असे वाटल्यावाचून राहत नाही.

ह्या मुळे प्रदूषण किती होत असेल वगैरे प्रश्न पडले असतील आणि स्वाभाविक आहे म्हणा!
वाहनांचा अति वापर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा कमी वापर हे हवा दूषित होण्याचे महत्त्वाचे कारण आहे नाही काआणि इथे बरोब्बर ह्याच्या उलट परिस्थिती असल्याने प्रदूषण मुळात बरेच कमी आहे. त्यामुळे वर्षातून एकदा ह्या हानाबी मुळे होणारे हवेचे प्रदूषण नगण्य आहे असे म्हणण्यास हरकत नसावी असे मला वाटते.

हजारो Fireworks उत्तम ताळमेळ आणि रचनेत हवेत उडताना पाहायला मिळणे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. दर वेळी नवीन थिम आणि नवीन कन्सेप्ट. फक्त गोलाकार आकार नसून विविध आकारातील फायरवर्क ह्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक हात त्या करिता कित्येक दिवस अहोरात्र झटत असतात. इव्हेंट्चे आयोजक पूर्ण तयारीनिशी स्वागत करण्यास सज्ज असतात. रचनाकार विविध कन्सेप्ट आणि रचना ठरवताना आपल्या कल्पनाशक्तीची विमाने उंच उंच नेत असतात.

जपानमध्ये विविध ठिकाणी हा फेस्टिवल साजरा होतो. हे Fireworks जगप्रसिद्ध असून बरेच महाग असतात. काही लोकल ठिकाणी तिथल्या हानाबी फेस्टिवल करिता शहर वासी देणगी गोळा करतात.
उंच इमारती असणार्‍या आणि पाहण्यास अडसर ठरेल अशा जागा टाळून हानाबी सर्व साधारणपणे लोकांना सहज दिसेल अशा ठिकाणाहून होस्ट करतात. काही प्रसिद्ध असणारे मोठे हानाबी इव्हेंट्स पाहण्यासाठी तर लाखो लोक हजेरी लावतात. काही ठिकाणी समुद्र किंवा नदी किनारी सुद्धा हे फेस्टिवल्स असतात. आजूबाजूच्या बऱ्याच लांब पट्ट्यात हानाबी पाहता येईल ह्याचा पुरे पूर विचार केलेला दिसून येतो.
मोठ्या इव्हेंट्स मध्ये काही विशेष जागा ‘स्पेशल स्पॉट’ राखीव असतात. पण त्यांचे तिकीट फारच महाग असते आणि सहजासहजी उपलब्ध होत नाही.
जपानी लोकांच्या घरात कोणी कधी असतं का नाहीचाहुल सुद्धा न लागू देणारे असेशांती आणि एकांत प्रिय जपानी. ह्या हानाबीचा मात्र घरांच्या गॅलरी मधून खिडक्यांमधून अगदी रस्त्यांवरती खुर्च्या मांडून सुद्धा आस्वाद घेतात. जपानचा पारंपारिक पोशाखांपैकी एक असणारा युकाता‘ घालूनमित्र मंडळी व नातेवाईकांबरोबर एन्जॉय करताना दिसतात. खाणे आणि पिणे‘ दोन्ही चालूच असते परंतु कधी कोणी जपानी आवरण्याच्या पलीकडे जाऊन कसाही वागतोय असे फार क्वचित होते.
हानाबी ताईकाई(Fireworks Competition) ह्या तर अतिशय भारी! जपानच्या विविध भागात अशा स्पर्धा चालतात. निगाता -नागाओका हानाबी फेस्टिवल‘ सारख्या भव्य स्पर्धा टीव्ही वरून सुद्धा प्रक्षेपित केल्या जातात.
तोक्यो सारख्या गर्दीच्या शहरात साजरी होणारी प्रसिद्ध आणि लोकप्रिय हानाबी आहे 
सुमीदागावा हानाबी‘.दोन टिमनदी किनारा, Sky-tree टॉवरउंच इमारती आणि लाखो लोक ह्यांच्या साक्षीने ही स्पर्धा रंगत जाते. दोन तास चालणारी ही आतिषबाजी आणि लखलखाट अनुभवण्यात वेगळीच मजा आहे.

इतके लोक एकत्र जमणार म्हणून सरकार तर्फे बरीच आगाऊ दक्षता घेतली जाते. किरकोळ इजा किंवा जखम सुद्धा कुणाला होऊ न देता इव्हेंट पार पाडले जातात.
ह्या वर्षी २०२० मध्ये कोरोना (COVID 19) मुळे हे सगळे हानाबी इव्हेंट्स रद्द झाले आहेत. परंतु कोरोना मुळे आलेली निराशा आणि अनुत्साह पळून जावा आणि लोकांमध्ये सकारात्मकता वाढावी म्हणून; १ जूनला जपानच्या ४७ राज्यात ‘Cheer Up’ हानाबी (Firework बनवणाऱ्या कंपन्या तर्फे आयोजित) ५ मिनिटे साजरी केली गेली. गर्दी टाळण्यासाठी वेळ, तारीख, लोकेशन इत्यादी माहिती गुप्त ठेवण्यात आलेली होती. आपापल्या घरांमधून ही आतिषबाजी पाहणाऱ्या साऱ्यांना तेंव्हा त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक आनंदी हानाबीचे स्मरण झाले असावे.

यंदाची Cheer Up हानाबीतिमिरातूनतेजाकडे घेऊन जाणारी ठरावी अशी अशा!

— प्रणाली भालचंद्र मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..