नवीन लेखन...

हाना झेन —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

हानाचा जन्म 17 जुलै 1921रोजी बुडापेस्ट हंगेरी येथे एका ज्यू कुटुंबात झाला.  तिचे वडील एक पत्रकार व नाटककार होते. ती सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिचे नाव प्रोटेस्टंट शाळेत नाव घातले,ती शाळा ज्यूना सुद्धा प्रवेश देत असे. पण त्यांना प्रोटेस्टंट पेक्षा दुप्पट,तिप्पट पैसे भरावे लागत होते.हाना 1939 मध्ये पदवीधर झाली त्यानंतर ती उत्तर इस्राइलच्या नहललयेथे मुलींच्या शेतकी शाळेत शिकण्यासाठी गेली. 1941 मध्ये ती इस्राईलच्या कीबुस प्रांतातील हेगनाह या पॅरा मिलेटरी फोर्स मध्ये दाखला घेण्यास गेली.जो इस्राइल डीफेंस फोर्सचा भाग होता. तिथे तिचे प्रेम जोसेफ वीस या  गूढ तत्ववेत्याशी जमले. त्याचाही 1943 मध्ये मृत्यू झाला. पुढे ती एसओई संघटनेत प्रवेश केला.आणि इजिप्त मध्ये परशूट प्रशिक्षण घेतले. 1943 मध्ये पेलेस्टाईन ज्यू संघटनेने पॅरॅशूटने शत्रूच्या हद्दीत उतरवण्याचे ठरवले जे मित्रराष्ट्रांच्या ज्यूना मदत करणार होते एकंदर 250 ज्यू पैकी 32 ज्यू उतरवण्यात येणार होते. त्यात हाना होती. 14 मार्च 1944 रोजी तिला युगोसलावकिया मध्ये उतरवण्यात आले. आणि ती परशीयन ग्रुपला जाऊन मिळाली. तिथे तिला समजले की जर्मनांनी हंगेरी आधीच ताब्यात घेतले आहे त्यामुळे हे मिशन धोकादायक असल्याने रद्द करण्यात आले. पण हाना हंगेरीच्या सीमेच्या दिशेने जाऊ लागली. तिथे तिला व तिच्या मित्राला हंगेरीच्या सैन्याने ताब्यात घेतले. तिथे तिच्याजवळ एसओई साठी वापरात येणारे ट्रान्समिटर सापडले. तिला तुरुंगात पाठवण्यात आले. तिचे कपडे काढून तिला खुर्चीला बांधण्यात आले. आणि तीन दिवस चाबुकाने मारण्यात आले. या मारहाणीत तिचे अनेक दात पडले. सैनिकांना तिच्याकडून कोडवर्ड हवा होता जेणेकरून बाकीचे ज्यू पॅरॅशूटने कुठे उतरवले आहेत ते समजेल. व त्यांना पकडू शकतील हानाने कोडवर्ड देण्यास नकार दिला. तिच्या आईला सुद्धा अटक करण्यात आलीव तिला मारण्याची धमकी देण्यात आली. तरी तिने कोडवर्ड दिला नाही. 28 ऑक्टोबर 1944 रोजी अॅरो क्रॉस कोर्टातर्फे तिच्यावर खटला भरण्यात आला. तिची शिक्षा आठवड्याने पुढे ढकलली कारण न्यायाधीशांची बदली झाली. 7 नोव्हेंबर 1944 रोजी तिला फायरिंग स्क्वॉड कडून गोळी घालून मारण्यात आले. ती मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत डायरी लिहीत असे त्यात ती एके ठिकाणी म्हणते “ जुळीमध्ये मी तेवीस वर्षांची होईन.मी अनेक खेळ खेळले आता फासे गुंडाळून ठेवले आहेत,मी हरले आहे. दुसरीकडे लिहिले आहे की मला कोवळे ऊन खूप आवडते.तिची डायरी 1946 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तिच्या सगळ्या वस्तु 1950 मध्ये इस्राइलला आणण्यात आल्या. आणि जेरूसलेम मधील माऊंट हऱ्झ येथे सन्मान पूर्वक दफन करण्यात आल्या.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..