हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.
हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.
चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:
१)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.
२)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.
३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.
४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.
५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.
६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply