नवीन लेखन...

हरभरे अथवा चणे

एक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात. म्हणजेच हरभरा हा संपूर्ण प्रोटीनयुक्त असतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे हरभरे शिजविल्यावर त्याची प्रथिने कमी होतात. हा फरक सोडला तरी हरभरे खाणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले अथवा मुली यांना हरभरे उकडून खाल्ल्याने खूपच परिणाम दिसून येतो. जेव्हा हरभरे १०० ग्रॅम अथवा उकडलेले असतात त्यात खालील गुणधर्म सापडतात. प्रथम अमायनो ॲसिड.

 

कच्च्या चण्याची डाळ बनते. त्याचे बेसन अथवा अन्य काही पदार्थ बनवून त्याची अनेक पाककृती बनविता येतात. अर्धा किलो चण्याची डाळ व अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ याचे मिश्रण करून ते दळण्यास देणे व या पिठाची अनेक पाककृती बनविता येते. जसे मिश्रणाचे तुपातील लाडू अथवा धिरडे किंवा थालीपीठ हे अन्न फारच पौष्टिक असते ते मुलांना शाळेतून येताना अथवा जाताना उपयोगी पडते. अशा अनेक हरभरा अथवा मुग व उडीद हे तिनही प्रकार फारच पौष्टिक असतात. फक्त मुलेच नाही तर तरुण तरुणी अथवा ज्येष्ठ नागरिक यांना फारच चांगले व पौष्टिक अन्न मिळते.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..