हिंदीतील काही गीतकार देशभक्तीवर गाणी लिहिण्यासाठी प्रसिद्ध असतात.काही रोमेंटिक लीहिण्यासाठी, तर काही उर्दूतील काव्यासाठी प्रसिद्ध असतात.पण काही गीतकार मात्र गाण्याच्या प्रत्येक प्रकारात मुशाफिरी करू शकतात.अश्याच गीतकारापैकी एक राजेंद्रकृष्ण. त्यांचे पूर्ण नाव राजेंद्रकृष्ण दुग्गल.जन्म अखंड भारतातील जलालपूर जत्ता येथे ०६ जून १९१९ रोजी झाला.लहानपणापासून त्यांना शायरीची आवड होती. सातवीमध्ये असताना ते अभ्यासाच्या पुस्तकात शायरीची पुस्तके लपवून वाचत असत. पुढे ते १९४२मध्ये सिमला येथे वीज मंडळाच्या कार्यालयात नोकरीला लागले.त्या वेळी सिमल्याला मोठे मुशायरे होत असत. त्यांनी एका मुशायरा मध्ये उर्दू कविता वाचली.त्याला खूप वाहवा मिळाली.तेथे त्यांची भेट मशहूर शायर जिगर मुरादाबादिशी झाली त्यांनी सांगितले. इथे काय करतोस.मुंबईला जा. तिथे हिंदी सिनेमात नाव कमावशील. म्हणून ते मुंबईला आले.”जनता” चित्रपटात पहिल्यांदा गाणी लिहिली.
१९४८ गांधीहत्येनंतर त्यांनी “सुनो,सुनो,ऐ दुनियावालो बापूजीकी अमर कहानी” गाणे लिहिले जे रफिसाहीबानी गायले होते संगीत होते,हुस्नलाल भगतराम यांचे. ते प्रचंड गाजले. “बडी बहन” ची गाणी खूप गाजली.त्याबद्दल निर्मात्याने त्यांना ओस्तिन कार भेट दिली.त्यांनी हिंदीतल्या जवळजवळ सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले.हुस्नलाल भगतराम पासून ते आर.डी.बर्मन पर्यंत.एका झटक्यात गाणी लिहिणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांची गाणी लिहिण्यावर इतकी हुकुमत होती कि ते लिहायला कागद नसेल तर पाच मिनिटात सिगारेटच्या पाकिटावर गाणे लिहित असत..ए.व्ही.एम.प्रोडक्शनच्या निर्मात्याला कमी वेळात चित्रपट आझाद बनवायचा होता व त्यांना १५ दिवसात गाणी तयार करून हवी होती. ते पहिल्यांदा नौशाद कडे गेले.त्यांनी सांगितले मी चाली लावण्यासाठी कमीतकमी सहा महिने घेतो.पंधरा दिवसात एक गाण्याची चालही बनवणार नाही.तो निर्माता सी.रामचंद्र यांच्याकडे गेला. सी रामचंद्र यांनी राजेंद्रकृष्ण यांना विचारले व निर्मात्याला सांगितले “कबुल आहे,पण हॉटेल मध्ये आमची सगळी खातिरदारी करावी लागेल” निर्माता तयार झाला. राजेंद्रकृष्ण यांनी एका दिवसात पाच गाणी लिहिली. सी रामचंद्रांनी ती गाणी १५ दिवसात रेकोर्ड करून दिली.सगळी गाणी हिट झाली. लता मंगेशकर यांनी गायलेलं एकमेव केब्रे गाणे ”आ,जाने,जा”, जे गाणे ऐकताना ठेक्यावर पाय थिरकलेच पाहिजेत असे “ शोला, जो,भडके” आणि ज्या गाण्याशिवाय बसची पिकनिक पुरीच होऊ शकत नाही ते “ देखा ना हाय रे सोचा ना” हि गाणी राजेंद्रकृष्ण यांचीच होती. ज्या राजेंद्रकृष्ण यांनी “यक चतुर नार”असे धमाल गाणे दिले त्याच राजेंद्रकृष्ण यांनी अदालत मधील कोठीवरील नर्गिसच्या व्यथेची “उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते” व “यु हसरतोके दाग मुह्बत मे धो लिये “ सारखी काळजाचा ठाव घेणारी गाणीही दिली.संवाद लेखक म्हणून मेहमूदला काय पाहिजे ते त्यांनी बरोबर ओळखले आणि साधू और शैतान,प्यार किये जा,पडोसन,Bombay to Goa यासारखे चित्रपट दिले.
राजेंद्रकृष्ण यांनी सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले असले तरी त्यांचे खरे सूर जुळले ते सी. रामचंद्र.आणि मदन मोहन बरोबर.सी रामचंद्र बरोबर समाधी,पतंगा,अलबेला,अनारकली,आशा,
आझाद, इ व मदन मोहन बरोबर जेलर,भाईभाई,मनमौजी,देख कबीर रोया,गेट वे ऑफ इंडिया,जहा आरा,अदालत इ.चित्रपट केले. ३५० पेक्षा जास्त गाणी लिहूनही त्यांचे स्वताचे आवडते गाणे होते.अदालत मधील ”जाना था हमसे दूर बहाने बना लिये “.
रणजीत स्टुडिओचे मालक निर्माता चंदुलाल शाह पासून ते अभिनय सम्राट मोतीलाल पर्यंत ज्याना रेसकोर्सच्या व्यसनाने होत्याचे नव्हते केले त्याच रेसकोर्सने राजेंद्र कृष्ण यांना १९७२मध्ये अठेचालीस लाख चौर्याहत्तर हजार रुपयांचा जेकपोट मिळवून दिला.त्याबेळी एका चित्रपटाचे एव्हढे बजेट असे. त्यांनी एक लाख रुपये prime minister फंडाला दिले तेव्हा एव्हढी मोठी रक्कम देणारा कोण आहे अशी चौकशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली.त्याचवेळीत्यांना असेही समजले कि हि रक्कम tax free आहे. त्यांनी दोनच दिवसात अध्यादेश काढून जेकपोटच्या रकमेवर tax सुरु केला.त्यानंतर राजेंद्र कृष्ण यांनी लिखाण कमी केले.त्यांनी २३ सप्टेंबर १९८७ला जगाचा निरोप घेतला .
— रवींद्र शरद वाळिंबे.
Leave a Reply