जन्म. २० जून १९७५ रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे.
‘टाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले. वैभव मांगले यांचे लहानपण, शालेय शिक्षण देवरुख येथे, व कॉलेज गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरी. वैभव मांगले कलाक्षेत्रात आपली कारकीर्द घडविण्यासाठी मुंबईत आले. बीएससीचे शिक्षण पूरे करून शिक्षकी पेशा स्वीकारला.
‘झी मराठी’वरील ‘फु बाई फु’ स्कीट्स मुळे वैभव मांगले यांना मोठी लोकप्रियता मिळाली. टीव्ही मालिकांमध्ये काम करीत असतानाच वैभव मांगले यांनी रंगभूमी आणि चित्रपटांमधील प्रवासही सुरूच ठेवला. ‘लव्ह बेटिंग’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘पोस्ट कार्ड’, ‘चांदी’, ‘टुरिंग टॉकीज’, ‘पिपाणी’, ‘काकस्पर्श’, ‘शाळा’, ‘लहानपण देगा देवा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हे त्याचे काही महत्त्वाचे चित्रपट.
‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘करून गेलो गाव’, ‘वासूची सासू’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ ही त्यांची गाजलेली नाटके.
‘शेजारी शेजारी सख्खे शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधील त्याचा अनुभव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सध्या चेटकिणीच्या भूमिकेत वैभव मांगले यांनी जबरदस्त धमाल उडवून दिली आहे. वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलले ‘अलबत्त्या गलबत्या’ हे नाटक गाजत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply