संवाद लेखन
हरिप्रिया
१)
प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट.
१)
प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार?
२)
प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो.
२)
प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे
३)
प्रियकर:-अन् तो दिवस उगवला .
३)
प्रेयसी:-१५ऑगस्टचा
४)
प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!!
४)
प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस.
५)
प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला.
५)
प्रेयसी:-अरे,अजूनही जपून ठेवलाय मी माझ्या डायरीत.
६)
प्रियकर:-मी तर पाकळ्या सुद्धा मोजल्या होत्या त्याच्या.
६)
प्रेयसी:-तब्बल १६ होत्या,गंमत म्हणजे माझं वयही १६च होतं
७)
प्रियकर:-म्हणूनच मी ते फुल निवडलं होतं.
७)
प्रेयसी:- किती बारीक सारिक गोष्टींचा विचार करायचो नं आपण.
८)
प्रियकर:-तुला आठवतं,आपण एकाच ताटात जेवलो होतो.
८)
प्रेयसी:-आणि तो एकमेकांना भरवलेला घास.
९)
प्रियकर:-मी एफ.वाय ला होतो.
९)
प्रेयसी:- हो ना,आणि मी अकरावीला.
१०)
प्रियकर:-लास्ट इयरला मी कॉलेज सोडलं .
१०)
प्रेयसी:-आणि आपल्या भेटी-गाठी कमी झाल्या.
११)
प्रियकर:-नोकरी निमित्त मी परगावी गेलो.
११)
प्रेयसी:-आणि ,आणि फक्त विरह विरह आणि विरह…
१२)
प्रियकर:-अशातच तुझ्या बाबांनी तुझं लग्न लावून दिलं.
१२)
प्रेयसी:-हो!!!!!
त्या दिवशी माझं कशातच लक्ष नव्हतं.
१३)
प्रियकर:-तु तर एका पुतळ्यावत सगळ्या विधिंना पार पाडलस.
१३)
प्रेयसी:-पण तुला हे कसं काय कळलं
१४)
प्रियकर:-आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो,हे सागण्यासाठी मी आलो होतो.
१४)
प्रेयसी:-पण,तुला उशीर झाला यायला असंच ना.
१५)
प्रियकर:-हो .हे खरच आहे.मी उशीरा पोचलो.
१५)
प्रेयसि:-आणि मी कायमची दुसऱ्याची झाले.
१६)
प्रियकर:-तुला आठवतं ,मी तुला एक पत्र पाठवलं होतं.
१६)
प्रेयसी:-जपून ठेवलं आहे मी ते पत्र.
१७)
प्रियकर:-मी तुला वचन दिलं होतं,ते आजतागायत पाळतोय.
१७)
प्रेयसी:-असं नको होतं तू करायला.
१८)
प्रियकर:-मी केलं ते बरोबरच.
१८)
प्रेयसी:-कसं काय?
१९)
प्रियकर:-कारण तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही तितकच अतूट आहे ,याची खात्री आहे मला.
१९)
प्रेयसी:-पण शरीराने मी तुझी कधीच नाही होऊ शकणार रे मी.
२०)
प्रियकर:- नाही तर नाही.
२०)
प्रेयसी:-असं का करतोस? तुही लग्न कर. तुझा संसार बघून मला बरं वाटेल.
२१)
प्रियकर:-नाही अगं!आता ते शक्य नाही.
२१)
प्रेयसी:-पण का?
२२)
प्रियकर:-कारण तुझ्या पतीला मी वचन दिलय.
२२)
प्रेयसी:-काय सांगतोस?आणि ते वचन तरी कोणतं
२३)
प्रियकर:-ते आजारी पडल्यानंतर त्यांनी मला एक दिवस भेटायला बोलवलं.आपलं प्रेम त्यांना ठाऊक होतं.अशातच ते आजारी झाले.आपल्या जगण्याची शाश्वती नाही ,हे बघून तु व तुझी मुलं ,ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.
२३)
प्रेयसी:-आणि हे सगळं तू मला आज सांगतोय.
२४)
प्रियकर:-हो,कारण मी वचनबद्ध होतो
२४)
प्रेयसी:- किती मोठा हा त्याग. किती मोठं समर्पण.
२५)
प्रियकर:-तुझ्या सुखातच माझं सुख मी बघितलं प्रिये.
२५)
प्रेयसी:- निघते मी,घरी जायलाच हवं.मुलं वाट बघत असतील.
पण हे दिलवरा मी तुला वचन देते ,की ही प्रिया पुढील जन्मी निश्चितच
*हरिप्रिया* झाल्याविना रहायची नाही.ह्या प्रियेला हरी पासून साक्षात परमेश्वरही दूर करू शकणार नाही.
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply