हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील ‘उमर ख़ैय्याम’ ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध ‘मधुशाला’ ही ‘उमर ख़ैय्याम’ ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. ‘मधुशाला’ मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
‘मधुशाला’ च्या काही काव्य पंक्ती.
मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।
– हरिवंश राय बच्चन
Leave a Reply