नवीन लेखन...

हरलेल्याचे बक्षिस

सध्या अनेक क्षेत्रात पारगंत होण्यासाठी छंदवर्ग आहेत. आईबाबा दोघेही नोकरी करतात. भरपूर पैसा आहे आणि एक किंवा दोन मुलं. त्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावे. म्हणून मुलगा जे करायचे म्हणतो ते करु देतात. पण ध्येय कोणते हे दोघांनाही माहिती नाही. ध्येयाच्या प्रती एक पाऊल पुढे टाकले तरी ती प्रगती असते. यश अपयश हे महत्वाचे नाही. पैकी एक होणारच मात्र त्यातून काय शिकायचे हे समजले पाहिजे. माझ्या नातवाने क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवले. रोज न चुकता आवडीने सरावासाठी मैदानावर जायचा. त्याची आई नियमित पणे नेणे आणणे करते. हल्ली मुलांना छंदासाठी मागावे लागत नाही. सगळे काही एकाचवेळी मिळते..याची पण खरेदी झाली. दो मिनिटका जमाना आहे. ज्या छंदवर्गाला मुले जातात. आणि इकडे त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्याच्या यशस्वी जीवनाची स्वप्न आईबाबा यांच्या कडून मोठ्या आशेने पाहिली जातात. भिमसेन जोशी लता मंगेशकर. हीच मंडळी नव्हे तर अनेक क्षेत्रात दिग्गज यश किर्ती मिळवून जगात नावलौकिक मिळविला आहे. ते साधसोप सरळ नाही. त्या काळी असणारे घरातील व बाहेरील समाजातील वातावरण अनुकूल नव्हते. खूपच धडपडत. हालअपेष्टा सहन करत यशस्वी झाले होते….

आता रणरणते ऊन. दोन वर्षे घरात बसून शाळा झाली. त्यामुळे आईबाबांना आनंद झाला अगदी आमच्या सह तो बाहेर खेळायला जातो याचा. आई जायची आणायला सोडायला. शेवटी आईच ती एवढे तरी करावे लागते. (पू. साने गुरुजी) शामला पोहण्याची भिती वाटायची म्हणून तो रोज टाळाटाळ करायचा आणि एकदा तर शामच्या आईला खूप राग आला होता म्हणून तिने त्याला माळ्यावर लपलेल्या शामला दरदरून ओढत आणले. व मित्रांना सांगितले न्या याला आणि ढकला विहिरीत पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. यात आईला हे अभिप्रेत होते की हातपाय हलवावे लागतात. नाकातोंडात पाणी शिरू नये म्हणून पाणी दोन्ही हातांनी सारुन शक्ती पणाला लावून पुढे जायचे असते. आपल्या मुलाला पोहता येत नाही असे कुणी म्हणू नये एवढीच माफक अपेक्षा होती. म्हणूनच आजही शामची आई आदरणीय आहे.

माझ्या नातवाने सलग चार दिवस असल्या उन्हात रोज दुपारी एक ते सायंकाळी पाच असे चार सामन्यात भाग घेतला होता. डबा पाणी घेऊन जायचा. आणि रोज आला कि खाली मान घालून बसायचा. ही शांतता मला असह्य झाली घरातील हसरे चैतन्य म्हणजे एकमेव तोच. चारही दिवस त्याचा संघ हरला होता म्हणून. आईबाबा आजोबा सगळे सांगत होते. उपदेश करत होते पण हा मनातून खिन्न. त्यामुळे मी त्याला त्याच्या आईला बोलावले आणि पाचशे रुपये दिले आणि सांगितले यातून चॉकलेट आईस्क्रीम जे म्हणेल ते आणा माझ्या तर्फे बक्षिस. तसे त्याला नवल वाटले आणि विचारले जिंकल्यावर बक्षिस असते पण आम्ही हरलोत. अरे बाळा अशा उन्हात दुपारी रोज चार दिवस सतत खेळणे सोपे नाही. शिवाय हरलात म्हणून सामना सोडून दिला नाही. जिद्द ठेवली हे मात्र महत्वाचे आहे कौतुकास्पद आहे म्हणून बक्षिस दिले आहे. आता हरण्याने आणखीन कोणकोणते फायदे झाले…..

(१) जिद्द सोडायची नाही.
(२)उन्हातान्हाची कारणे सांगायची नाहीत.
(३)जिंकलेल्यांचे अभिनंदन करायचे.
(४)हरलेल्याचे दु:ख उगाळत बसायचे नाही
(५)एक ध्येय निश्चित करायचे. हे जमत नाही म्हणून ते असे नाही करायचे.
(६) अथक परिश्रम करायचे. नुसतीच स्वप्न बघायची नाहीत

अजून बरेच काही गोष्टी आहेत ज्या शिकून नाही तर अनुभव घेउन शिकायच्या असतात. मी बक्षिस दिले पण त्याची उमेद जागी झाली. आणि आमच्या घरातील हरवलेले चैतन्य परत आले. नुसता पोशाख. बॅट चेंडू घेऊन निघाला की सचिन तेंडुलकर होत नाही. त्याला सचिन तेंडुलकरच्या जीवनाचा इतिहास सांगा. वाचायला द्या.. बघा पटतंय का नाही तर द्या सोडून…

–सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..