वाढता हवेत हा गारवा
बाजारी चिंच,बोरे,आवळा
ऊस नी हिरवा हरबरा
खाण्या हा जीव होई बावळा
सांजवात होताच शेकोटी
पेटवू उब मिळविण्यास
फड रंगे गप्पांचा भोवती
चहा रिचवावा हाच ध्यास
पहाटे चला जाऊ शेतात
भरित मेजवानी जोमात
जोडीला हुरडा असावाच
हवेत हा गारवा झोकात
— सौ. माणिक (रुबी)
Leave a Reply