हे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
तिच्या
आधरांवर
अस्फुटांचे
काही बोल फुलावे
अन्
मिठीत तिचिया
मज
उद्ध्वस्ताचे स्वप्न पडावे
हे
कसले नाते …
तिच्या
माझ्यातील पुसते अंतर
ती
रडते थोडी …
ओठावरती
प्राण आणुनी हसते नंतर .
हे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
— गजानन मुळे
Leave a Reply