नवीन लेखन...

हे सार थांबवा ! प्लीज !!

“हे पहा मी अजून एकदा तुम्हास हात जोडून विनंती करतो कि, तुम्ही हे जे काय आरंभिले आहे ते थांबवा! ” मी काकुळतीने आर्जव केला. पण त्या पाली सारख्या  पांढऱ्या नर्सने माझे हात पाय त्या लोखंडी कॉट ला करकचून बांधलेच. बहुदा ती बहिरी असावी किंवा रोबोट असावी. माझा आवाज इतका करुण होता कि पाथरला सुद्धा पाझर फुटला असता. पण या बयेवर काहीच परिणाम झाला नव्हता.

ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती.  त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक  दरवाजा होता.  तो ही पांढरा फटक! खरे तर ‘पांढरा’ रंग पवित्र आणि शांत असतो. हि खोली पण शांतच होती ,पण प्रसन्न नव्हती. हा पांढरा रंग  पवित्र वाटण्या ऐवजी अभद्र भासत होता. त्यातला हा जांजलेला, कॉट, कॉट कसला ? पांढऱ्या रंगातली ती ताटीच! त्यावर नवंकोरं झिरझिरीत मद्ऱ्याच्या कापड सारखी चादर, अन त्यावर हात पाय बांधलेल माझं गाठोडं . त्या खोलीत काळपट पडलेली एक ट्यूबलाईट ,  उदबत्ती सारखा प्रकाश गाळत होती,अगदीच नाईलाज झाल्या सारखी! तिथला ‘प्रकाश’कुठल्याही अंधाराला लाजवील असा होता. पण हे सहाजिकच होते. किती ‘मृत्यू ‘ला या खोलीच्या भिंती साक्षीदार होत्या याची मोजडत त्यांच्याही लक्षात नसावी! हो , या खोलीत आधुनिक नियमाप्रमाणे ‘मृत्यू दंडा’च्या शिक्षेची आंमलबजावणी केली जाते! हल्ली फाशी ‘क्रूर’ पद्धत म्हणून बंद झालीय म्हणे!

त्या खोलीत माझ्या शिवाय अजून दोन व्यक्ती उपस्थित होत्या. एक काळ्या कपड्यातील आणि एक पांढऱ्या कपड्यातील. तो काळ्या कपड्यातील,पन्नाशीच्या आत बाहेरची व्यक्ती कमालीची क्रूरचेहऱ्याची  तरी शांत भासत होती. तो बहुदा ‘जल्लाद’ किंवा एक्झेक्युटर असावा. पांढऱ्या कपड्यातील  चष्मिस्ट डॉक्टर असावा कारण त्याने पांढरा अप्रोन घातला होता, गळ्यात टेथस्कोप अडकवला होता आणि अकालीच त्याला शाळीग्रामा सारखे तुळतुळीत टक्कल पडले होते.

” अहो , प्लिज  कोणी तरी हे थांबवा हो!” मी पुन्हा माझी विनंती त्यांच्या पुढे दिन आवाजात मांडली.
“माझ्या तरुण मित्रा, आता हे कसे थांबवता येईल? तू त्या निरागस आणि सुंदर तरुणीचा खून केलास! आणि तुझा गुन्हा कोर्टात सिद्धही झालाय!”डॉक्टर आपला चष्मा सावरत मला म्हणाला. त्याला खूप घाम येत असावा कारण त्याचा चष्मा नाकावरून सारखा खाली घसरत होता. बहुदा हि त्याची पहिलीच असाइनमेंट असावी.
” सुंदर ,हो खरच ती खूप सुंदर होती! आणि जीनच्या पॅन्ट मध्ये आकर्षक पण दिसत होती! निरागस मात्र अजिबात नव्हती! बदमाश होती!”
” कशा वरून ?”
“कशावरून काय ? तिने माझे पॉकेट मारले होते!”
“तिने नाही! तूच तिचे पॉकेट मारलस ? पोलिसांना ते तुझ्याच कडे सापडले होते!”
“तेच तर!मला जे वरदान मिळालंय त्या प्रमाणेच घडत होत!माझे जे कोणी नुकसान करेल ते नुकसान करणाऱ्यालाच भोगावे लागते! त्यामुळेच तिचे पॉकेट माझ्या खिशात आले असावे!”
“मुर्खा सारखा बडबडू नकोस!अरे मरताना तरी खरे बोल!”तो काळा खाटीक कर्कश आवाजात खेसकला.
“अहो , खर तेच सांगतोय! मी कोर्टात पण शपतेवर हेच सांगितलंय. पण तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीत?”
“अरे नीच माणसा , त्या पोरींचे पॉकेट मारून तुझे समाधान झाले नाही.तिच्या एकटेपणाचा आणि असहाय्यतेचा तू ‘फायदा’ घेण्याचाहि प्रयत्न केलास! तिने विरोध केला तर तू चक्क खिशातले पिस्तूल काढून तिचा खून केलास! पिस्तूल तुझ्याकडूनच जप्त झालाय,त्यावर तुझ्याच बोटाचे ठसे आहेत,आणि त्यातल्याच गोळीने तो कोवळा ,सुंदर जीव घेतलाय!हे तरी सत्य आहे का नाही?”तो खाटीक आता पिसाळला होता. तरी मी माझा बचाव चालूच ठेवला.
“नाही हो! जेव्हा तिचे पॉकेट माझ्या खिशात आले,तेव्हा ते मला जाणवले. मी ते तिला परत करण्यासाठी तिच्या कडे वळलो. तिला तिचे पाकीट देताना मी तिला हेच सांगत होतो कि माझे नुकसान करण्याचा प्रयत्न करू नकोस. ते तुझ्यावरच उलटेल!पण तिने ऐकले नाही. तिने झटक्यात आपल्या पॅन्टच्या हिप पॉकेट मधून दडवलेले ते छोटस पिस्तूल काढून माझ्यावर रोखलं आणि पिसाळलेल्या मांजरी सारखी ओरडली, ‘आहे तेथेच थांब! तुझ्या गळ्यातली सोन्याची चैन ,हातातील हिऱ्याच्या दोन्ही आंगठ्या,आणि खिशातील मोबाई ,पैसे माझ्या हवाली कर!नसता तुझा मुडदा पाडीन !!’ देवाशपथ सांगतो काय भयानक आवाज होता तिचा!मी तिला पुन्हा पुन्हा हेच विनवीत होतो कि ‘असे करू नकोस.’ पण ती ऐकेना. हेकट असावी. नाईलाजाने मी गळ्यातली चैन,आंगठ्या,खिशातील पैसे,मोबाई वगैरे तिला देण्यासाठी तिच्या कडे सरकलो. दुर्दैवाने एका गोल गोट्यावर माझा पाय पडला आणि मी धडपडलो. मला गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. माझ्या छातीशी क्षणभर जळजळ झाली. मी वाकून माझ्या छातीकडे पहिले.  शर्टचा खिश्या जवळचा भाग सिगारेटच्या चटक्याने जळवा तसा जळून काळे छिद्र पडले होते. ती माझ्या समोर पडलेली दिसली. तिच्या छातीतून उसळणारे रक्ताचे पाट एव्हाना मलूलपणे झिरपत होते!  आणि तिचे ते पिस्तूल माझ्या हातात होते. ”

माझा बंदोबस्त करून गेलेली ती पांढऱ्या पालीसारखी दिसणारी नर्स सलाईन स्टॅन्ड  आणि एक औषध ठेवण्याचा ट्रे घेऊन आवतारली. तिने तो स्टॅन्ड माझ्या कॉटच्या उशाशी मांडला. त्यावर ट्रे मधली लपस्टिकची सलाईनबॉटल वटवाघूळ झाडाला लटकवा तशी उलटी लटकवली. सलाईनच्या बाटलीतून निघणाऱ्या पारदर्शक पातळ ट्यूबच्या टोकाला असलेली बोथट सुई माझ्या मनगटावरील निळ्याशार ठळक रक्त वाहिनेत निर्दय पणे खुपसली.
” अहो ,थोडेसे हळू.”मी कळवळलो.
ती जवळच खोलीतल्या एकमेव डुगडुगत्या खुर्चीत,मक्खचेहऱ्याने बसून राहिली.
मग तो चष्मिष्ट डॉक्टर पुढे सरसावला. त्याने अप्रोनच्या खिशातून एक इंजक्शनचे अम्प्यूल काढले. ट्रे मधील नवीन सिरिंजमध्ये अँप्युल मधील औषध ओढून घेतले. सिरिंज डोळ्यासमोर उंच धरून ,डोस योग्य प्रमाणात असल्याची खात्री करून घेतली. नाकावर ओघळणारा चष्मा सावरत त्याने औषध सलाईनच्याबाटलीत इंजेक्ट करून टाकले.
“माझ्या तरुण मित्रा, जे झाले ते झाले. तू काय केलेस, तू तिला आणि कोर्टात काय म्हणालास त्याच्याशी आमचा काडीचाही सम्बन्ध नाही!आता जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक! मी आत्ता जे औषध या सलाईनच्या द्रव्यात इंजेक्ट केलाय ते तुझ्या शरीरात सोडले जाईल. काही वेळातच,म्हणजे फक्त तीस सेकंदात तुला गुंगी येईल. पापण्या मणा -मणाच्या जड होतील. अनावर झोप येईल! तू गाढ झोपी जाशील. तरीही हे औषध कार्यरत राहील. तुला अजून खोल -खोल घेऊन जाईल. अगदी ते तुला कोमात नेवून सोडेल. तरीही त्याचे कार्य चालूच राहील.! मग तुझ्या मेंदूच्या पेशीत ते शिरेल आणि एक-एक पेशी, शेवटी एकूण एक पेशी डिकापोज करेल! यालाच ‘मृत्यू’ म्हणतात!! सकाळी तुझ्या बॉडीचे पोस्टमोर्टम करून त्याचे सर्टिफिकेट दिले कि माझे ‘काम ‘ पूर्ण होईल! तुला काही शेवटचे ‘शब्द ‘ बोलायचे असतील तर, बोल. आम्ही त्याचा आदर करू !” डॉक्टर म्हणाला. या चार सहा वाक्यात त्याला धाप लागली होती. घाम सुटला होता. नाकावरचा चष्मा सांभाळताना त्याची तारांबळ होत होती.
“अहो, मी पुन्हा हीच विनंती करीन कि ‘हे सगळं थांबवा! प्लिज !’ मी तुमचे हात जोडतो!”

डॉक्टरांनी खूण केली तसा तो काळा डोम पुढे सरसावला. त्याने तो सलाईनचा नॉब ऑन केला! सलाईनच्या बाटलीतले ते विषारी द्रव्य माझ्या रक्तवाहिनी कडे झेपावताना मला डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसत होते.!

एक -दोन-तीन-चार————-आठवीस , एकोणतीस , तीस !!

समोर उभे असलेले दोघेही जमिनीवर शांत , गाढ झोपले होते!
मला कॉटला बांधणारी ती पांढऱ्या पालीसारखी दिसणारी नर्स खुर्चीत करकचून बांधली गेली होत!
मी कॉट वरून उठलो.
ती नर्स माझ्या कडे डोळे फाडून पहात होती. ती जबरदस्त धक्क्यात ओरडेल असे वाटत नव्हते. तरी मी तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि ट्रे मधील चिकट पट्टीने तोंड सील केले. डॉक्टरांचा अप्रोन मी घातला, टेथस्कोप गळ्यात अडकवला, शेवटी त्याचा चष्मा डोळ्यावर लावला. एक शेवटची नजर त्या खोलीवरून फिरवली.
“तरी मी सांगत होतो कि ‘हे सार थांबवा !”
बिनधास्त हॉस्पिटल बाहेर पडताना स्वतःशीच पुट्पुलो .

— सु र कुलकर्णी

तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..