आपल्या शरीरासाठी पाणी म्हणजे जीवन असून आपल्या पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी श्वासाइतकीच पाण्याची देखील अत्यंत आवश्यकता असते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते तसेच त्याबरोबर आपल्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील पाण्याची खूपच मदत होते.
रोजच्या रोज शुदध पाणी पिल्याने आपण असंख्य आजारावर सहजपणे मात करू शकतो. काही वेळा आपल्यापैकी बरेच जण कामामुळे पाणी पिण्यास विसरून जातात पण हे असे कारणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असून पाण्याच्या प्रमाणाने शरीरातील विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले शरीर वाचू शकते. म्हणून आज आपण येथे जाणून घेवूयात की कमी पाण्यामुळे आपल्या शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात.
१) पोटाची तक्रार
शरीराला योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे असून कमी पाणी प्यायल्याने डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शरीरात पाण्याची मात्रा कमी झाल्यास पोटाची समस्या, अपचन, पोटात दुखणे असेही आजार होऊ शकतात. आपल्या शरीरातील कमी पाण्यामुळे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर न पडल्यामुळे शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात.
२) शरीरातील थकवा
शरीरात पाण्याची मात्रा प्रमाणात असेल तर शरीरातील थकवा दूर होण्यास खूपच मदत होते. कमी पाण्यामुळे शरीराला थकवा येऊन शरीरातील एनर्जी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, ताण, गोंधळलेपणा, अस्वस्थता या सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
३) हदयरोगाची समस्या
आपल्यापैकी बरेच लोक असे असतील जे दिवसभरातील कामामूळे पाणी पिणे विसरून जातात जे आरोग्यासाठी नुकसानकारक असू शकते. शरीरात पाण्याच्या कमतरतेने डिहाड्रेशन होऊन शरीरातील रक्त गोठू शकते ज्यामुळे रक्त प्रवाहामध्ये बाधा येवून हदयरोगाच्या तक्रारी निर्माण होवू शकतात.
४) चेहऱ्यावरील समस्या
प्रत्येकालाच चेहऱ्याची सुंदरता आवडते. त्यामुळे अनेक लोकं सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. परंतु त्यासाठी आपल्याला रोजच्या रोज शुदध पाणी गरजेचे आहे. आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता ही पाण्याच्या मात्रेवर टिकून असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. भरपूर प्रमाणात पाण्याची मात्रा असल्यास चेहऱ्यावर चमक येण्यास मदत तर होतेच परंतु जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर चेहऱ्यावर डाग, मुंरूमे, सुरकूत्या यांसारख्या समस्या वाढू शकतात.
५) लठ्ठपणाची समस्या
सतत फास्ट फूड आणि बाहेरचे पदार्थ खाल्यानेच लठ्ठपणा वाढतो असे नाही तर कमी पाणी पिल्याने देखील लठ्ठपणा वाढतो. पाणी कमी प्यायल्याने आपल्या शरीराचे वजन वाढून लठ्ठपणाचे विकार होऊ शकतात.
Leave a Reply