नवीन लेखन...

हेल्दी वूमन वेल्दी फॅमिली

Healthy Woman Wealthy Family

Healthy Woman Wealthy Family

नुकताच आपण सर्वांनी जागतिक महिला दिन साजरा केला. हेल्थ इज वेल्थ असे इंग्रजीत सांगितले आहे. आरोग्य ही आपली संपत्ती तर आहेच पण स्त्रीचे आरोग्य हीसुद्धा आपली एक संपत्तीच आहे असे मला वाटते. कारण स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते. तसेच स्त्रियांच्या सद्य आरोग्याचा वित्तीय उत्पादनावरही परिणाम होताना दिसत आहे

7 मार्च 2015 च्या टाईम्स ऑफ इंडिया ह्या वृत्त पत्रात आरोग्य तपासणी विषयी स्त्रीयांचे काय मत आहे ह्या उद्देशाने सर्वेक्षण केले आणि त्या निरीक्षणा बद्दलचा शोध प्रकाशित केला होता. निरीक्षणात 63% स्त्रीया आजारी पङे पर्यंत आरोग्याची तपासणी करत नाहीत, 36% स्त्रीया वर्षातून एकदा, तर 16% स्त्रीया आरोग्याची तपासणी कधीच करत नाहीत. जेव्हा ह्या स्त्रीया आरोग्याची तपासणी का करत नाहीत असे विचारले असता 30% स्त्रियांना ह्या तपासण्या अनावश्यक आणि खर्चिक वाटतात. 31% स्त्रीया वेळे अभावी तपासणी करत नाहीत तर 40% स्त्रियांच्या मते त्यांचे आरोग्य उत्तम आहे. ह्यावरून असे दिसते कि अजूनही स्त्रिया आपल्या आरोग्य चाचण्या बद्दल विशेष काळजी घेताना दिसत नाहीत.

स्त्रियांमध्ये आढळणारे सामान्य रोग

स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) – उशीराने होणारी लग्न, पहिले मूल होण्यातील दिरंगाई, स्तनपान कमी प्रमाणात करणे किंवा अजिबातच न करणे, स्थूलता आणि लठ्ठपणाची समस्या, तेलकट आणि गोड पदार्थांचे अतिसेवन, तसेच अनुवंशिकते सारखा एखादा जास्तीचा घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आणखीन वाढवतो.

स्ट्रोक – सामान्यतः मधुमेह (डायबेटिस) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ह्या दोन व्याधी स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरतात असे दिसते, व्यायामाची कमतरता, कॅलरीजच्या खर्चा पेक्षा कॅलरीजचे सेवन जास्त प्रमाणात करणे, जंक फूड (स्वास्थ्य बिघडवणारे पदार्थ) खाणे, गोड आणि खारट पदार्थांचे अतिसेवन ह्या दोन रोगाचा धोका जास्त वाढवतात

पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम (पिसिओस/पीसीओङी) – प्रजनन वयोगटातील 5 ते 10% स्त्रियांना ह्या एनङोक्राईन रोगाचा त्रास होतो असे आढळले आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, स्त्री बिजांच्या निर्मीतीत महत्वपूर्ण सहभाग असलेल्या अन्नघटकांची कमतरता, आवश्यकतेपेक्षा वजन वाढत जाणे, पियर शेप (नासपती फळाच्या आकाराचा) लठ्ठपणा, पोटाच्या भागात जास्त चरबी जमा होणे, ह्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो तसेच तणाव ह्यामुळे ही पिसिओडि ची समस्या उदभवू शकते

वजन वाढणे – बऱ्याचदा स्त्रियांमध्ये स्थूलता आणि लठ्ठपणा दिसून येतो. सर्व साधारणतः लग्नानंतर आणि बाळंतपणात ही समस्या जास्तच वाढल्याचे दिसून येते. काही सर्वेक्षणात असे ही आढळले आहे कि बहुतांश भारतीय स्त्रिया ह्या त्यांचा स्टांङरङपेक्षा (मापकापेक्षा) जास्त लठ्ठ आढळतात. गर्भधारणा, शारीरिक हालचालीची कमतरता, खाण्याच्या अयोग्य सवयी, काही अन्नघटकांची कमतरता, तर काही अन्नघटकांचे अतिसेवन, झोपेची कमतरता, तणाव, काही औषधांचे सेवन जसे की ङिपरेशन कमी करण्यासाठी देण्यात येणारी औषधे

मेटाबॉलिक सिंड्रोम – स्थूलता आणि लठ्ठपणा, शारीरिक हलचाल योग्य प्रमाणात न करणे, अनुवंशिकता, गर्भधारणा, पीसीओङी, गर्भधारणा होऊ नये म्हणून घेण्यात येणारी औषधे, मासिकपाळी थांबल्यानंतर (मेनोपॉज), गर्भारपणात आढळणारा मधुमेह (जीडीएम्) असल्यास, साखर घातलेली पेय्य, तळकट पदार्थांचे अतिसेवनाने इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो ज्यामुळे ह्याचा धोका वाढतो

अनिमीया – रक्तक्षय – चुकीचे खाण्याची सवय, लोह (आयर्न), फोलिक असिड, जीवनसत्व ब12 ह्या सर्वांची किवा एखाद्या अन्नघटकाची कमतरता, जेवणा बरोबरच चहा, कॉफ़ि ह्या सारखे कॅफिनयुक्त पदार्थ घेतल्यास आहारातील लोह ह्या खनिजाचे शोषण योग्य प्रमाणात होत नाही, मासिकपाळीत अति रक्त स्त्राव होणे ह्यामुळे अनिमीया होऊ शकतो

हृदयविकार – हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तरूण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. धावपळीची कार्यपद्धती, धुम्रपान, दारूचे सेवन, सध्या गर्भधारणा होऊ नये म्हणून घेण्यात येणारी औषधांचे वाढलेले सेवन, शारीरिक हालचालीची कमतरता, वेळी अवेळी खाण/जेवण, तसेच 30 ते 35 ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये चॉकलेट, चिप्स ह्या सारखी कमफ़र्ट फूड खाण्याची सवय वाढलेली आढळते
संधिवात (अरर्थायटीस) – स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा संधिवाताचे प्रमाण जास्त आढळते तसेच चाळीशी नंतर ह्याचे प्रमाण वाढलेले आढळते, अनुवंशिकता लठ्ठपणा, वारंवार सांध्यांची केलेली हलचाल, प्रो-इनफ्लमेटरी आहाराचे सेवन उदाहरणार्थ नॉनव्हेज (मांसाहार) तळलेले पदार्थ जास्त घेणे वगैरे, ह्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो

ऑस्टिओपोरोसिस – लठ्ठपणा, हाड कमजोर असणे, कॅल्शियम ह्या खनिजाचे आणि ड जीवनसत्वाचे सेवन कमी करणे, सूर्यप्रकाशाची मुबलकता असूनही सूर्यप्रकाशात न जाणे ज्यामुळे शरीरात जीवनसत्व ड योग्य प्रमाणात तयार होत नसल्याने ड जीवनसत्वची कमतरता, तसेच प्रो-इनफ्लमेटरी आहाराचे सेवन ऑस्टिओपोरोसिस साठी कारणीभूत ठरतात

Healthy Woman Wealthy Familyकामावर जाणाऱ्या भारतीय स्त्रीयांचे आरोग्य

कामावर जाणाऱ्या स्त्रीला कामाच्या ठिकाणी कर्मचारी म्हणून असलेली जबाबदारी आणि घरी आल्यावर घरची जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टींचा ताण त्या स्त्रीला भोगावा लागतो हे मागच्या वर्षीच्या जागतिक महिला दिना निमीत्ताने असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ( ASSOCHAM) हया संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले. अहमदाबाद, बैंगलोर, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैद्राबाद, जयपुर, कोलकता, लखनौ, मुंबई, आणि पुणे ह्या 10 मुख्य शहरात 11 आर्थिक विभागात आरोग्याची तपासणी विषयी सर्वेक्षण केले. ह्या संस्थेने 120 कंपन्यातील 32 ते 58 ह्या वयोगटातील 2800 कामावर जाणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी केली. तपासणीच्या केलेल्या सर्वेक्षणा वरून असे दिसून आले की

• 4 पैकी 3 स्त्रियांमध्ये आरोग्याच्या काही ना काही तक्रारी होत्या
• 78% स्त्रियांनी आपल्याला आरोग्याच्या तक्रारी आहेत असे नमूद केले.
• पाठदुखी, डोकेदुखी, डिप्रेशन (उदासीनता), लठ्ठपणा, मधुमेह, रक्तातील वाढलेले कोलेस्टरॉल (चरबी), हृदयरोग आणि मूत्रपिंडाच (किडनीचे) रोग ह्या सारख्या रोगांविषयी च्या तक्रारी जास्त होत्या.
• साधारणतः 42% स्त्रियांमध्ये जीवनशैलीमूळे होणारे रोग आढळले जसे की लठ्ठपणा, रक्तदाब, मानसिक आजार
• 22% स्त्रियांना क्रॉनिक आजार आढळले त्यातील 14% स्त्रियांमध्ये अॅक्यूट त्रास होत असलेले आढळले.

ह्यावरून स्पष्ट दिसते की स्त्रियांनी आणि त्यातल्या त्यात कामावर जाणाऱ्या स्त्रियांनी इतर जबाबदाऱ्या बरोबर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या समर्थ पणे सांभाळू शकतील.

BE HEALTHY FOR WEALTHY FAMILY

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..