हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता.
१९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्या मधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘निमोई संन्यासी’ ह्या बंगाली चित्रपटासाठी तर ‘ईरादा’ ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन मा.हेमंत कुमार यांनी चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले.
स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग ह्या बंगाली तर आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली. हेमंत कुमार यांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी देखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
हेमंत कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ही लोकप्रिय झाली. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंत कुमार यांची मराठी गाणी खूपच गाजली. हेमंत कुमार यांचे १६ सप्टेंबर १९८९ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply