डॉक्टरांना विचारावे. सोडियम असलेली औषधे किंवा खाद्यपदार्थ यामुळे रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच ॲटासीड, कॅनमधील खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, पापड-लोणची यांचे सेवन मर्यादित ठेवा. उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळ घ्यायची असल्यामुळे त्यांचे काही साइड इफेक्टस् दिसू शकतात. उदा. झोपून उठताना तोल जाणे, तोंड शुष्क होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, झोप न लागणे, मलावरोध इ. अर्थात हे साइड इफेक्टस् दिसतीलच असे नाही. काही रुग्णांना सुरुवातीला थोडा त्रास जाणवला तरी कालांतराने ते उपचारांना सरावतात.
काही साइड इफेक्ट वाटल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करावी. रक्तदाबाची बरीचशी औषधे गरोदरपणी आणि स्तनपान करताना घ्यायची नसतात. औषधे नेहमी सूर्यप्रकाशापासून आणि दमटपणापासून दूर, एका खोक्यात पण दिसतील अशा ठिकाणी ठेवावी.
बॉक्सवर गोळ्यांचे वेळापत्रक लावल्यास उत्तम. वार्षिक वैद्यकीय तपासणी अगदी २५ व्या वर्षापासून चालू केल्यास उच्च रक्तदाब वा इतर काही व्याधींचे लवकर निदान होऊ शकते. योग्य तेवढा व्यायाम, समतोल आणि सोडियम, स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात असलेला आहार, मानसिक तणावावर मात आणि औषधांचे वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन यामुळे उच्च रक्तदाबावर मात करून आपण आनंदी जीवन जगू शकतो.
डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply