बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला.
खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले.
संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट ‘लच्छी’ ची गाणी लिहण्यास दिले. मा.वर्मा पंजाबी चित्रपटाचे हिट गीतकार झाले. याच वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव बदलण्यास सांगीतले बरकत राय मलिक हे वर्मा मलिक नावाने ओळखू लागले.
वर्मा मलिक यांनी चाळीस पंजाबी चित्रपटासाठी गाणी लिहिली, तीन चित्रपटासाठी संवाद लिहिले व तीन चित्रपटासाठी निर्देशन केले. हिन्दी चित्रपट ‘दिल और मोहब्बत’ साठी ‘आंखों की तलाशी दे दे मेरे दिल की हो गयी चोरी’ हे गाणे लोकप्रिय झाले. पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.
मनोज कुमार वर्मा मलिक यांना ओळखत होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी रात अकेली, साए दो हुस्न भी हो व इश्क भी हो तो फिर, इकतारा बोले तुन तुन, ही गाणी वर्मा मलिक यांच्या कडून लिहून घेतली. मनोज कुमार यांनी इकतारा बोले तुन तुन, ‘यादगार’ चित्रपटासाठी वापरले, ते गाणे गाजल्यामुळे मा.वर्मा हे प्रसिद्धीच्या झोकात आले. रेखा यांचा पहिला चित्रपट ‘सावन भादों’ मधील वर्मा यांनी लिहिलेले ‘कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके’ हे गाणे अजून लोकांच्या ओठावर आहे.
या नंतर ‘पहचान’, ‘बेईमान’, ‘अनहोनी’, ‘धर्मा’, ‘कसौटी’, ‘विक्टोरिया न. २०३’, ‘नागिन’, ‘चोरी मेरा काम’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘संतान’, ‘एक से बढ़कर एक’, अश्या अनेक चित्रपटासाठी मा.वर्मा यांनी गाणी लिहिली. ‘पहचान’ चित्रपटातील गाणे सबसे बड़ा नादान वही है व ‘बेइमान’ चित्रपटासाठी जय बोलो बेइमान की जय बोलो या साठी त्यांना दोन वेळा फ़िल्मफेयर पुरस्कार मिळाला. ‘सावन भादो’ साठी ओमी यांनी वर्मा मलिक यांना गाणी लिहिण्यास सांगीतली. ‘सावन भादों’ ची गाणी हिट झाली. वारीस या चित्रपटातले ‘मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ‘ किंवा ‘नागिन’ यातील ‘तेरे इश्क का मुझपें हुआँ ये असर है ‘ हि गाणी तर ‘बेईमान’ या चित्रपटातले, ‘ये राखी बंधन है ऐसा’, ‘जैसे चंदा और किरण का, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का…’ हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है एक मेमसाब है साथ में साब भी है मेमसाब सुंदर सुंदर है साब भी खूबसूरत है नेपाळी गुरख्याच्या भूमिकेतील प्राण यांच्या वर चित्रित झालेलं हे गीत चित्रपटाचं विषेश आकर्षण आहे. नेपाळी व्यक्ती हिंदी गीत गात असल्यानं ‘स’ अक्षराच्या जागी ‘श’च्या उच्चाराची तसेच ‘बोलना’ क्रियापदावर कसरत करण्याची वर्मा मलिक यांनी कल्पकता केली होती.
आजही हिंदी भाषीकाच्या लग्नाच्या वरातीत ‘आज मेरे यार की शादी है’ व बिदाईला ‘बाबुल की दुआएं लेती जा’ ही गाणी ही गाणी वाजवली किंवा गायली जातात. ही दोन्ही गाणी वर्मा मलिक यांची.
वर्मा मलिक यांचे १५ मार्च २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://youtu.be/HIuYg2XBZMY
Leave a Reply