राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील ‘आंख का तारा’, ‘भक्त और भगवान’, व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, ‘शमशरे आलम’ या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली होती. दुर्द्व्याने त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यांचे पहिले गाणे त्या दहा वर्षाच्या असतना १९३४ साली एच.एम्.वी ने रेकॉर्ड केले होते. मा.राजकुमारी म्हटले की आठवतात तो मा.मधुबाला आणि मा.लता मंगेशकर या दोघीनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा “महल”. या चित्रपटात ‘घबराके हम” आणि “एक तीर चला” ही मा.राजकुमारी यांची दोन गाणी अप्रतिम होती. मा.लता मंगेशकर यांनी राजकुमारी बरोबर काही सुंदर गाणी गायली आहेत. यातील काही कोई नैनो में मेरे आके न जाए (मेहरबानी) संगीत-हफीज खान, हम आह भी करते है (वफा) संगीत-विनोद, जिंदगी बदली मुहब्बत का मजा आने लगा (अनहोनी) मा.श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ.पी.नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही मा.राजकुमारी फार गाजल्या नाही. रोशन यांनी “बावरे नैन”, “अनहोनी” अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना संधी दिली होती.
राजकुमारी यांची उतरत्या वयात इतकी वाईट परिस्थिती झाली की त्या पाकीजा चित्रपटात कोरस गाताना दिसल्या, संगीत कार नौशाद हे होते,त्यांना हे न बघवल्याने त्यांनी पाकीजासाठी राजकुमारी यांना चित्रपटासाठी काही ठुमरी गाण्याला सांगीतल्या,पण त्या कमाल अमरोही यांनी न वापरता बॅगराऊंडला वापरल्या,त्या अजुन ही एच.एम.व्ही व अमरोही कुटुंबाकडे असल्याचे म्हणतात.
राजकुमारी दुबे यांचे १७ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अमित सयानी यांनी घेतलेली राजकुमारी दुबे यांची मुलाखत.
राजकुमारी यांची काही गाजलेली गाणी
‘सुन बैरी बलमा कछू सच बोल’, नजरिया की मारी-मरी मोरी दइया’, ‘मुझे सच सच बता दो कब मेरे दिल में समाए थे’, ‘जब तुम पहली बार देखकर मुस्कराए थे’,’आंख गुलाबी जैसे मद की प्यालियां’, जागी हुई आंखों में है शरम की लालियां’, ‘एक तीर चला और घबरा के जो हम सर को टकरायें तो अच्छा हो’, ‘चुन चुन घुंघरवा’
Leave a Reply