नवीन लेखन...

हिंदी पार्श्वगायिका शमशाद बेगम

Hindi Playback Singer Shamshad Begum

शमशाद बेगम यांनी १६ डिसेंबर १९४७ रोजी लाहोर येथे पेशावर रेडिओवरुन गायनाची सुरुवात केली. आपल्या गोड गळ्याने त्यांनी रसिकांच्या मनांचा ठाव घेतला. त्यानंतर पेशावर, लाहोर व दिल्ली रेडिओ स्टेशनवर त्यांनी गाणी गायली.

१९४४ मध्ये त्या मुंबईत आल्या. बेगम यांनी नौशाद, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्रन, ओ.पी. नय्यर या संगीतकारांसाठी पार्श्वगायन केले. लाहोरमध्ये खजांची आणि खानदान या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. त्यांनी १९७५ सालापर्यंत पार्श्वगायन केले. मा. शमशाद बेगम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन कला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. लेके पेहला पेहला प्यार (सीआयडी), मिलते ही आँखे दिल हुआ, कभी आर कभी पार (आर पार), मेरी नींदो मे तुम (नया अंदाज), ओ गाडीवाले गाडी जरा धीरे हाक रे (मदर इंडिया), कही पे निगाहे कही पे निशाना (सीआयडी), मेरे पिया गये रंगून (पतंगा), एक तेरा सहारा (शमा), सैयॉं दिलमें आना रे, छोड बाबुल का घर, कजरा मोहब्बतवाला आँखियोंमें ऐसा डाला (द्वंद्वगीत) अशी अवीट गोडीची अनेक गाणी त्यांनी गायली. त्यांना स्वत:ला “छोड बाबुल का घर’ हे सर्वात आवडायचे. . “मुगले आझम’ मधील “तेरी महफिल में’ या सदाबहार कव्वालीतही त्यांचा आवाज आहे. त्यांनी चित्रपटांमधील अनेक कव्वाल्यां-मध्ये सहगायकांसमवेत पार्श्वगायन केले होते. मा.शमशाद बेगम यांनी मराठीतही गाणे गायले. १९५२ साली सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली “नरवीर तानाजी’ या चित्रपटासाठी शमशाद यांनी आशा भोसले, अमर शेख, वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत पार्श्वगायन केले.

भारत सरकारने २००९ साली पद्मभूषण पुरस्कार देवून त्यांच्या गायकीचा गौरव केला.

शमशाद बेगम यांचे २३ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

शमशाद बेगम यांची गाणी

https://youtu.be/WPklTciei-c

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..