नवीन लेखन...

हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन 

हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्‍त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत. आज आपल्या हिंदुस्थानचा स्वातंत्र्यता दिवस सर्व देशभक्‍तांच्या केवळ गर्वाचा दिवस नसून हा एक मंगलदिन आहे. गेल्या दिनापर्यंत केलेल्या कामगिरीचे तुझ्यासमोर नतमस्तक होऊन सिंहावलोकन करावयाचे व नव्या उत्साहाने आजपासून पुन्हा नवीन कामगिरीचे प्रतिज्ञाककण बांधावयाचे हा आजचा, आम्हा देशभक्‍तांचा खरा कार्यक्रम आहे. पण अव्यक्त परमेश्वराच्या व्यक्‍त स्वरुपा आज जरी आपण म्हणायला स्वतंत्र असलो तरी यापुढे आपण स्वतंत्र राहूच की नाही यात शंका आहे. साठ वर्षापूर्वी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपले राष्ट्र इंग्रजांच्या जुलमातूल स्वतंत्र केले खरे पण स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव साजरा करीत असताना आपल्या राष्ट्रावर विदेशी स्त्रीची सत्ता केंद्रात आहे. ही स्त्री आपले स्वातंत्र्य पुन्हा हिरावून घेईल. तेव्हासुध्दा आपल्या राष्ट्रातील नपुंसक काँग्रेसवाले त्यास्त्रीपुढे लोटांगण घालण्यास कमी करणार नाहीत.

पाकिस्तान पुरस्कृत मुस्लीमांच्या दहशतवादी कारवाया, मावर्सवाद्यांचा केंद्रस्थानी हस्तक्षेप. देशभक्‍तांना जातीयवादी ठरवून हिंदु नागरिकांना दोषी ठरवणे ही कसली लक्षणे आहेत? हे कॉंग्रेस सरकार आमची भारतमाता पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या शृंखलेमध्ये बंदीवान व्हावी असे इच्छित आहे. कारण हे ध्वजा तुला आभिमान वाटावा अशी कोणतीही चांगली कामगिरी या राष्ट्रात झाली नाही.

पुनरुत्थानाच्या मंगल सिंहनादात ध्येयवादाची सुर्याची प्रभा भविष्याच्या अरुणाचलावरुन हळूहळू फाकू लागली होती. अभद्र रडगाणी संपवून विजयी रणनिनांदांनी हिंदूराषट्राचे वातावरण भारले जात होते. तुझ्याजवळ नतमस्तक होऊन सिंहावलोकन करताना लाजेने आमचे चेहरे काळवंडून जात नव्हते. कारण तुझ्याजवळ निवेदन करायला अल्प स्वल्प का होईना मा. अठलबिहारी वाजपेयींच्या उत्तुंग कामगिरीचे भांडवल आमच्याजवळ होते. मा. अटलबिहारी वाजपेयी यांची सत्ता गेली आणि दुरष्टप्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले. हे ध्वजा तुला दिल्लीच्या लाल किल्यावर गर्वाने फडकवण्यासाठी ज्या स्वा. सावरकरांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता अंदमानसारख्या ठिकाणी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. इंग्रजांच्या अत्याचाराची पर्वा न करता इंग्रजांना ताठ मानेने सामोरे गेले. त्या स्वातंत्र्यविरांची वचने काढून टाकण्याचे कूकर्म कॉंग्रेसवाल्यांनी केले. तेव्हा तू ही डौलाने फडकत असताना, तुझी मान खाली गेली असेल.

हिंदूंचे परमोच्च गुरु शंकराचार्य यांना तुरुंगात टाकून संपूर्ण हिंदूसमाजाला बदनाम करण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. पण आम्ही खचलो नाही पण आज नव्या उत्साहाने नव्या दमाने आम्ही तुझे पूजन करण्यासाठी जमलो आहोत. हिंदूंवर होणारे अत्याचार, मुस्लिम दहशतवाद्यांकडून होत असलेले बॉम्बस्फोट, बांगलादेशींची घुसखोरी तर दुसर्‍या बाजुला हिंदूंना संपविण्याचा डाव पध्दतशिरपणे चालविला आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात रक्‍तलांछित काळाचे मुर्ति चित्र आमच्यासमोर उभे आहे. संक्रमण काळातील सारी सुखदुःखे आज आमच्या समोर हात जोडून उभी आहेत. ह्या सस्यशामल, मलयज शीतल भूमीवर लवकरच प्रलयंकारी अग्निवर्षावाची साक्ष आम्हाला ऐकू येऊ लागली आहे.

आम्हाला तुझा अपमान होऊ द्यायचा नाही. या स्वातंत्र्यदिनी नव्या कामगिरीचे प्रतिज्ञा कंकण बांधण्यासाठी आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक झालो आहोत. सध्या देशावर राज्य करीत असलेली विदेशी छाया दूर्‌ करण्यासाठी स्वा. सावरकरांसारख्या देवदुर्लभ नेतृत्वाची गरज आहे, मनिषा आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहिद भगतसिंग सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या नव्या उमेदीच्या राष्ट्रपुरुषांच्या हस्ते पुन्हा लाल किल्यावर तुला अभिमानाने फडकविणे हे आमचे यापुढचे स्वप्न आहे. या पवित्र स्वातंत्र्यदिनाच्या सुप्रभाती ह्या मंगलमय स्वप्नाच्या सिध्दीसाठी कराव्या लागणाऱ्या पराक्रमाच्या स्फुर्तीसाठी आम्ही तुला विनम्र अभिवादन करत आहोत.

-विद्याधर ठाणेकर

सनातन प्रभात १५ ऑग.२००६

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..