सह्यगिरीच्या डोंगररांगा
हिरवाईने नटून बहरल्या |
रंगबिरंगी रानफुले गोजिरी
भाळावरती त्यांनी माळीली |
संततधारा शिरी बरसात होत्या
मेघातुनी अलवारश्या रेषा |
झाकोळून गर्द रंग हा गहिरा
घननीळ नभातच मिसळून गेला |
वेध लागले सहस्त्ररश्मीला
कधी पाहतो शृंगार धरेचा |
हळूच बाजूला करुनी ढगांना
थोपविल्या त्या झरझर धारा |
अलगद पसरली रवी किरणेही
सोन पाऊली धरणीवर उतरली |
उघडून निळी आभाळाची छत्री
प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |
व्योमाच्या या लख्ख उजेडात
सातारा माझा उजळुन निघाला |
सृष्टीच्या ऐकून या काव्या
भैरोबा पेढ्याचा हसला ||
?मी सदाफुली
©✍️संध्या प्रकाश बापट
Leave a Reply