नालंदा विद्यापीठाचा इतिहास—(भाग 1)
नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले.
दुसऱ्या प्रवादानुसार बोधिसत्व येथे रहात असे आणि तो कायम दान करत असे,तिसरा प्रवाद देणगी संस्थेकडे,सतत येते,पण देणगीदारांना दिल्याबद्दल पुरेसे समाधान मिळाले नाही.इसवीसना आधी हि जागा फार धार्मिक होती.त्या वरुन नाव पडले
इथे बुद्ध व त्यांचे शिष्य रहात असत व त्यांच्यात वादविवाद घडत असे. याच ठिकाणी महावीर गोसालाना भेटले. नगारजून सुद्धा येथे चर्चा घडवत असत. अशोकाने येथे मंदिर व विहार बांधले.विद्यापीठ शंकरदत्त यांनी बांधले त्यांचा पुत्र बुधगुप्तराज यांनी त्याचा विस्तार केला.खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा विस्तार पाचव्या शतकात झाला जेव्हा हुशार विद्यार्थ्यांचा येथे ओघ सुरू झाला.
विद्यापिठाचे बांधकाम—-सकारादित्यने पहिली इमारत बांधली. त्यांचा पुत्र बुद्धगुप्तराज याने दुसरी इमारत बांधली.या इमारती अद्भुत होत्या. त्याची मैदाने भव्य होती. तलावात कमळे असत.लाल रंगाची कनक फुले असत.स्थापत्यशास्त्राचा तो उत्तम नमूना होता.विद्यापीठाच्या मध्यभागी सात भव्य कक्ष होते.
प्रवेश प्रक्रिया— प्रवेश फक्त पदवित्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थानसाठी असे. विद्यापीठ देशातील तसेच देशाबाहेरील उच्चविभूषित विद्यार्थी यांच्यासाठी वादविवाद व शंका निरसन करून घेण्यासाठी प्रसिद्ध होते.यासाठी मांगोलिया चीन,कोरिया,तिबेट येथून विद्यार्थी येत.काही विद्यार्थी बुद्ध वाङमय वरील लिखाण शोधण्यासाठी येत.तर काही विद्यार्थी मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी येत. ज्यां विद्यार्थ्यांना विद्यापीठात,प्रवेश मिळवायचा असे व कठीण परीक्षा उत्तीर्ण करायची असे.यापैकी फक्त वीस टक्के विद्यार्थ्याना प्रवेश मिळत असे.
विद्यार्थ्यांची वास्तव्याची व्यवस्था
विद्यार्थाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसे. कोणत्याही श्रीमंत विद्यार्थ्याला वेगळी वागणूक दिली जात नसे. यांचे कारण विद्यापीठाकडे भरपूर पैसा असे. बुद्ध विद्यार्थी भिक्षा मागत.यांचा अर्थ विद्यापीठाकडे पैसा कमी आहे असा नाही. तर यांचे कारण विद्यापीठाचे शैक्षणिक मूल्य, विद्यार्थयामध्ये नम्रता व त्यागाची भावना निर्माण करणे.भिक्षा मागण्याचे कारण मनातील अहंकार दूर करणे असे..
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply