नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम
हिंदू,बौद्ध महायाना सर्व विद्यार्थ्यासाठी अतिशय विस्तृत होता आणि त्यात सर्व विषयांचा समावेश होता. मोजकेच विषय अनिवार्य होते. महायाना व बुद्धवाद या विषयाचे अभ्यासक्रम अनिवार्य होते. जे विषय ऐछिक होते त्यात तर्कशास्त्राचा महत्वाचा भाग होता. जोतिषशास्त्र शिकवले जाई.त्यामुळे वेधशाळा व कालमापन यंत्र यांचा वापर होई. कालमापन यंत्रामुळे पूर्ण मघध राज्यात वेळ अचूक सांगण्यास मदत होई. तंत्रविद्या जी विज्ञानावर आधारित होती ती खूप लोकप्रिय होती. वेद उपनिषद वैदकीय, व्याकरण, संख्याशास्त्र ,कायदा,तत्वज्ञान भाषाशास्त्र हे महत्वाचे विषय शिकवले जात. विषय वेगवेगळ्या शास्त्रातून निवडले जात. जसे तत्वज्ञान,प्रयोगशास्त्र,विज्ञान,कला,इत्यादि. विद्यापीठाद्वारे सहा वर्षांच्या विद्यार्थ्याना प्राथमिक शिक्षणसुद्धा दिले जाई. त्यांना संस्कृत शिकवले जाई कारण संस्कृत हिंदू व बौद्ध विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थ्याना पाणिनीच्या व्याकरणातील सूत्रपाठ व धातुपाठ शिकवलं जाई. दहाव्या वर्षी व्याकरणाचे सखोल द्यान दिले जाई. तीन वर्षात तो यात निष्णात होत असे. स्मरणशक्तीचे सगळे अभ्यासक्रम मुखोद्गत करावे लागत. विद्यापीठाच्या पुढील अभ्यास क्रमात पतानजली शिकवले जाई,क्षत्रिय विद्यार्थ्याना वरील सर्व विषयांशिवाय धनुर्विद्या सुद्धा शिकवली जाई.व न्याय व वैसेशीका (अणू संबंधी ज्ञान,त्यावेळी आपण भारतीयांना अणूची संकल्पना माहिती होती. )
विद्यापीठातील प्रशासन पद्धती
विद्यापीठाचा प्रमुख भिक्षू असे. त्याला बुद्धिमता, वारिष्टता नुसार निवडले जाई. त्याच्याकडे विद्यापीठाची संपूर्ण प्राशासनिक,शैक्षणिक सूत्रे असत. दोन परिषद मदतीला असत.एकीचे काम अभ्यासक्रम निवडणे, शिक्षकांना कामे नेमून देणे.परीक्षा घेणे,हस्तलिखित जतन करणे,तर दुसरीचे काम आर्थिक व्यवहार बघणे, इमारतीची देखभाल करणे. विद्यार्थ्याना खोल्या उपलब्ध करणे, जमिनीची देखभाल करणे,विद्यापीठाची जागा शेतकऱ्यांना भाड्याने देणे. त्यांच्याकडून धान्य गोळा करणे. ते खांनावळीला पुरवणे,प्रत्येक शिक्षकाच्या हाताखाली अनेक विद्यार्थी असत. त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीची जबाबदारी शिक्षकावर असे.हे शिक्षक विहार व मठ यांच्या अधिपत्याखाली असत.शिक्षकांचे सगळे निर्णय विहार व मठ ठरवत असे.विद्यार्थाना शिक्षा देण्याचे अधिकार मठ व विहार यांना असे.
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply