हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या,
गोऱ्या रंगावरी आमुच्या,
जनहो नका हो भाळू,
टपोरेआकार पाहुनी,
मोहून नका हो हाताळू,
कौमार्य फुलते आमचे,
दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद,
मगच उमलेल फूल हे सुंदर ,
येईल मोगऱ्याला बहर,
स्पर्श न करता नेत्रसुख घेता,
घ्या हो आमुचा आस्वाद,
किती थोडे आमचे जीवन,–
बघता बघता येते मरण,–!!
फुलून कोमेजणे केवळ,
एवढेच काम या धरतीवर,
अशा अल्प जीवनात,
भरून राहतो सुगंधात,
आमचा असून वाटतो,
येईल त्याला या जगात,
स्त्रीच्या लाडके आम्ही ,
नका पुरुष हो इतके जळू*,
आमच्या सुगंधेभारुन, त्याही प्रेम लागतील करू,–
फुले मोगऱ्याची देऊनी,
आपल्या प्रेमा पटवती,-!
असे मिलन घडवतो,
अहो,भाग्यवानकिती,?
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply