MENU
नवीन लेखन...

होलोग्राम

होलोग्राम आपण पाहिला असेल, पण त्याला होलोग्राम म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा काही विशिष्ट अक्षरे ही होलोग्रामने सादर केली की, त्यांची नक्कल करणे शक्य नसते. आता आपल्याकडे बनावट गुणपत्रिका किंवा इतरही बनावट कागदपत्रे तयार केली जातात.

त्याला आळा घालण्यासाठी होलोग्रामचा वापर केला जातो. विद्यापीठांच्या गुणपत्रिकांवरही होलोग्राम असतो. क्रेडिट कार्ड, काही चलनी नोटा, सॉफ्टवेअर्स यावर असे होलोग्राम असतात. त्यात मेटालिक पॅटर्नमध्ये आपल्याला विविध रंगसंगती असलेल्या प्रतिमा दिसतात. आपल्या डोळ्यांना एखाद्या वस्तूचे दृश्य ज्ञान होते, कारण आपले डोळे चांगले प्रकाश संवेदक असतात. कुठल्याही वस्तूच्या प्रतिमेची संवेदना आपल्या मेंदूत तयार होते, पण मेंदू ती अगदी जशीच्या तशी स्मृतीत ठेवू शकत नाही.

त्यावर नंतर छायाचित्रण कलेचा शोध लागला. यात प्रतिमा साठवता येत होत्या, पण एखादे छायाचित्र काढले तेव्हा त्या वस्तूवर पडलेला तेव्हाचा प्रकाशकिरण थोडाच तुम्हाला परत निर्माण करता येणार आहे. होलोग्राम हे असे छायाचित्र असते की, जे अमर्त्य असते. काच, प्लास्टिक किंवा मेटलच्या चौकटीत असलेली ती छायाचित्रे आहेत. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचे छायाचित्र घेतो, तेव्हा त्या वस्तूपासून एकाच दिशेने निघालेले प्रकाशकिरण टिपत असतो.

पण तीच वस्तू वेगळ्या कोनातून वेगळी दिसत असते. थोडक्यात आपण काढतो ती त्रिमिती छायाचित्रे नसतात. आपले डोळे मात्र कुठल्याही पदार्थाची त्रिमिती प्रतिमा बघत असतात. होलोग्राममध्ये एक प्रश्न उरतो, त्यात खरे व त्रिमिती चित्र कसे दिसते? त्याचे उत्तर होलोग्राम निर्मिती तंत्रात दडलेले आहे. होलोग्राम तयार करताना फोटोग्राफिक प्लेट वापरली जाते. ज्या वस्तूचा किंवा चित्राचा होलोग्राम तयार करायचा, त्यावर लेसर किरण सोडला जातो. त्याचे दोन भाग असतात, त्यातील एकाला ऑब्जेक्ट बिम, तर दुसऱ्याला रेफरन्स बिम म्हणतात. हे दोन्ही किरण फोटोग्राफिक प्लेटवर जिथे एकत्र येतात तिथे होलोग्राफिक प्रतिमा तयार होते. एखादी वस्तू कुठल्याही कोनातून कशी दिसते याची कायमस्वरूपी नोंद म्हणजे हा होलोग्राम असतो.

एखाद्या वस्तूचा होलोग्राम काचेत तयार केला असेल व आपण तो फोडला तरी त्याच्या तुकड्यांतही तुम्हाला त्या वस्तूची प्रतिमा दिसेल. ही होलोग्रामची खासियत असते. वेगवेगळ्या कोनांतून आपल्याला तो वेगळा दिसतो म्हणूनच ते चित्र त्रिमितीसारखे दिसते. होलोग्राफीचा शोध भौतिकशास्त्रज्ञ डेनीस गॅबर यांनी १९४७ मध्ये लावला व १९७१ मध्ये त्यांना त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. १९८० नंतर होलोग्रामचे तंत्र विज्ञानाच्या प्रयोगशाळेतून बाहेर आले व नंतर मेटालिक व ग्लास फ्रेममध्ये आले. स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली याच्यासह काही कलाकारांनी या तंत्राचा वापर केला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..