नवीन लेखन...

‘हॉटमेल’चे सबीर भाटिया

Sabeer Bhatia, the Hotmail founder of Indian origin, has now launched a new self-funded short video platform ShowReel, that combine short videos and targeted interviews into a tool that people can use for everything from getting that dream job to pitching to a VC investor, to even finding a mate for life.

जन्म.३० डिसेंबर १९६८ चंदीगड येथे.

सिलिकॉन व्हॅलीत चमक दाखविणाऱ्या पहिल्या पिढीचे भारतीय उद्योजक सबीर भाटिया यांनी आपल्या छोट्या कारकीर्दीत यशापयशाची ही दोन्ही टोके अनुभवली. चंदीगडमधल्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सबीर भाटियांचं सुरवातीच्या काळातलं शिक्षण भारतातचं झालं. नंतर त्यांनी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधे एमएस केलं. काही काळ जगप्रसिद्ध ॲ‍पल कंपनीत काम केलं. १९९४ मधे आपल्या एका सहकारी जॅक स्मिथच्या सोबत स्वतःचं काम सुरू केलं. सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ या दोघांच्या डोक्यात हॉटमेलची कल्पना अगदी सहज गप्पा मारता मारता आली आणि गुंतवणूकदारांच्या मदतीनं त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन केली.

सुरवातीला ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ कंपनीचे चौदापैकी तीनच पगारी कर्मचारी होते. अर्थात हॉटमेलच्या प्रगतीबरोबर त्यांचीही संख्या वाढून ६० झाली. सुरवातीपासून कॅलिफोर्नियामधल्या सनीवेलस्थित ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनं मेलची सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत द्यायला सुरवात केली. इंटरनेटचा जन्म झाल्यावर ही सुविधा मोफत देणारी ही पहिलीच कंपनी होती. त्याबरोबर लोकांनी धडाधड हॉटमेल मध्ये आपली खाती उघडायला सुरवात केली. पहिल्याच वर्षी हॉटमेलचे एक कोटीहून जास्त सभासद झाले होते. त्यावेळी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही हॉटमेलनं मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले! या हॉटमेलवर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्सही त्यावर फिदा झाला आणि १९९८ साली त्या काळी ४० कोटी अमेरिकन डॉलरला मायक्रोसॉफ्टनं ‘हॉटमेल’ खरेदी केली! मायक्रोसॉफ्टशी करार झाल्यावर कंपनीचे सगळे साठच्या साठ कर्मचारी चक्क कोट्यधीश झाले होते.

सबीर भाटिया यांनी मायक्रोसॉफ्टला ‘हॉटमेल’ विकल्यावर त्यांनी वर्षभराच्या अंतराने ‘आरजू’ ची मुहूर्तमेढ रोवली होती. पण तंत्रज्ञानाचे जागतिक दालन अल्प गुंतवणुकीत उपलब्ध करून देणारे व्यासपीठ हे आरजू ने निवडलेले सेवा क्षेत्र तत्सम डझनावारी साइट्स इंटरनेटवर उपलब्ध असल्याने सपशेल अपयशी टरले. २००१ मध्ये अखेर सबीर भाटिया यांना आरजूचा हा प्रयोग गुंडाळावा लागला. २००६ मध्ये सबीर भाटिया यांनी ‘आरजू डॉट कॉम च्या नव्या रूपातील पुनरागमनानेच सुरू केली. आरजू चे नवे रूप हे ‘ट्रॅव्हल पोर्टल च्या धाटणी होते. कुटुंबांसाठी सहल आयोजनाचे सर्वाधिक पसंतीचे टिकाण बनावे आणि सर्व पकारच्या पर्यटनविषयक सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध कराव्यात अशा बेताने ‘आरजू’ ला त्यांनी नवे रूप दिले होते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..