|| हरि ॐ ||
कशी गुल झाली वीज ही,
आता तरी लावशील का,
कंदील, बुदल्या आणि मेणबत्त्या?
रात्र मिट्ट काळोखाची,
सरेल कधी आणि उजाडेल कधी?
हा क्षण कित्येक तास राहिला,
त्या अनर्थ तू म्हणशील का?
हृदयात आहे धडधड काळोखाची आणि,
थरथरत्या ओठात भीती पण,
ह्या काळरात्रीत साथकरणारा,
दिवा कुठला सांगशील का?
हवे जे जे मिट्ट काळोखात,
लाभले मेणबत्ती, कंदील आणि टॉर्च हे,
तरी काही राहिले असेल कमी,
त्याची पूर्तता शासन करेल ना?
अतिरिक्त वापराने वीज गेली असेल जरी,
कळता झाली चूक ही,
पण सांग वीज येईल ना?
आणि
सर्व व्यवहार सुरळीत चालू होतील ना?
<जगदीश पटवर्धन बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply