नवीन लेखन...

लोण्याचा गोळा कसा तयार होतो?

रवीने घुसळल्यावर लोण्याचा गोळा कसा तयार होतो?

आपल्या नित्य व्यवहारात आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारे अभियांत्रिकी कौशल्यसुध्दा अगदी सहजगत्या वापरत असतो. आजूबाजूचा परिसर तर सोडाच पण, आपल्या घरात, अगदी थेट आपल्या स्वयंपाकघरात, अनेक उपकरण आणि आयुध लीलया पेलत असलेली गृहिणी, एखाद्या भल्या थोरल्या  कारखान्याच्या चीफ इंजिनियरलाही लाजवेल, अशा दिमाखात आपली अभियांत्रिकी कौशल्य वापरत असते.

स्वयंपाकघरात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी उपकरणं वापरतांना गृहिणी आपला अभियांत्रिकी मेंदू सहजच उपयोगात आणते.

उदाहरणादाखलच घ्या ना! ताक घुसळायची रवी हे एक चक्राकार गतीने चालवायच उपकरण. रवीच्या दांड्याला गती दिली की ताक घुसळल जातं आणि लोण्याचा गोळा ताकावर तरंगायला लागतो. ताक करणाऱ्या माऊलीला माहिती असो वा नसो, पण या प्रक्रियेत ती अपकेंद्री बल या तद्दन वैज्ञानिक संकल्पनेच्या आणि चक्राकार गती देणाऱ्या रवी या तंत्रज्ञानाच्या अविष्काराची सांगड घालते. अपकेंद्री बल म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्या अक्षाभोवती, गोल म्हणजे चक्राकार फिरत असेल तर, ती अक्षापासून बाहेरच्या बाजूला ढकलली जाते. त्यातच ती वस्तू जेवढी वजनदार असेल तेवढी ती जास्त दूर ढकलली जाते.

नेमकं हेच तत्त्व रवीने ताक घुसळतांना वापरलं जातं. ताकात विस्कळित असलेले अगदी सूक्ष्म लोण्याचे कण रवी गोलाकार फिरायला लागली की बाजूला
ढकलले जातात. हळूहळू एकमेकांपाशी जमायला लागतात, त्यांचा मोठा गोळा व्हायला लागतो. रवीने घुसळत राहिल की शेवटी लोण्याचा एक मोठा गोळा तयार होऊन ताकावर तरंगतो.

हेच तत्त्व वापरून फूड प्रोसेसरमध्ये कणीक मळली जाते. गव्हाच्या पीठात पाणी घालून चक्र फिरवलं की, पीठ भांड्याच्या कडेला ढकललं जातं, पीठाचे कण एकमेकांजवळ ढकलले जाऊन शेवटी कणकेचा गोळा तयार होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..