भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत. आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही त्याचीच परिसीमा ठरली.
नपुंसक विचाराच्या पाकिस्तानला जेंव्हा समोरा समोर जमिनीवर लढून युद्ध जिंकता येत नाही तेव्हा ते छुप्या आणि कपट मार्गाने काहींना काही उचापती करून भारताला नुकसान पोचवत असते.
मुळात काश्मीर प्रश्न हे एक निमित्त आहे. तसेच बाबरी प्रकरण हे देखील एक निमित्तच आहे. जे कुणी धर्मांध लोक मुस्लिम समाजात प्रथम पासून आहेत त्यांना दोनच गोष्टी माहिती आहेत दार उल इस्लाम आणि दार उल् अरब ! त्यांच्या दृष्टीने काफर लोकांकडे जी भूमी आहे ती भूमी श्रद्धावान मुस्लिम लोकांची बनवण्यासाठी जे युद्ध केले जाते ते युद्ध म्हणजे जिहाद ! आणि मग जिहादी लोकांना त्या कामासाठी प्रेरित करून अंतिम स्वरूप देण्यासाठी त्यांची वेगळी यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. त्यामुळेच अतिरेक्यांचे कारखाने तयार होत आहेत. देशालगत असलेली एकेकाळची आमचीच भूमी, ही आता अतिरेकी निर्माण करणारी भूमी झाली आहे. आणि अशांना मदत करून मोठं करण्यासाठी आणि ते मतांच्या भिकेसाठी आमचेच निर्लज्ज राजकारणी पुढारी सन १९४७ पासून धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करून उभ्या देशाला गंडवीत आहेत. त्यामुळे विनाकारण हिंदू आणि भारतीय फौज यांचा नाहक बळी जात आहे.
याची अनेक उदाहरणं देता येतील. नुकताच झालेला काश्मीर येथील पुलवामा भीषण हल्ला घ्या. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रेकद्वारे जैश – ए – मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घडवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे ४४ भारतीय जवान मारले गेले. त्यांचे शव अंतिम संस्कारापर्यंत पोचले नाहीत तोवर टीव्ही वर चमकेश लोकांचे डिबेट सुरू झाले. मुत्सद्दी असलेल्या राजकारणी मंडळींनी दोषारोप देणे सुरू केले. त्यांच्या आत्म्याला शांती लागायच्या आधीच काही जणांनी तर मोदींचा राजीनामा मागितला. काही अतिउत्साही पुढाऱ्यांनी तर राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त करावे अशी मागणी केली. काही जण मोदींना कॉर्नर करण्यासाठी त्यांच्या छातीचे माप मोजू लागले. काहींना तर, आता मोदींना ह्या घटनेचा फायदा येत्या निवडणुकीत कसा घेता येईल याची चिंता लागली.
परंतु खरा प्रश्न असा आहे की, सर्वसामान्य जनता काय विचार करणार आहे ? ज्या देशातला बहुतांश तरुण हा “व्हॅलेंटाईन डे” सारख्या परकीय संकल्पनेत आकंठ बुडाला असताना आपल्या संस्कृत देशात अशा प्रकारच्या अप्रिय घटना घडतात. मग अशा घटना घडून गेल्यावर उमटणारे पडसाद हे खरोखर त्याची देशभक्ती प्रज्वलित करतील की स्मशान वैराग्य सारखे काही काळ सवंग देशभक्तीचे प्रदर्शन करून पुन्हा ही तरुणाई, हा समाज आपल्या दिनक्रमात मग्न होत शांत होईल?
ज्यावेळी हिंदू आणि मुस्लिम यांचे प्रश्न आमच्या राजकीय धुरिणांना समजले नाही आणि मग त्यातून देशाची फाळणी झाली. या देशाचे दोन तुकडे झाले. त्यावेळी पाकिस्तानचे जीना यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्नशील पाकिस्तान नव्हे, तर त्या प्रयत्नांची बीजे ही अलिगड विद्यापीठात होती हे न समजल्या मुळे आज ही देशद्रोही विषवल्ली तेथे वाढत आहे. पाकिस्तानच्या निर्मितीची खरी कारणे आजच्या पिढीला न समजल्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली. आम्ही ‘खिलापत चळवळीचे’ अपयश लपवून ठेवले. आम्ही लखनौ करारातील फुटीची बीजे समजावून घेतली नाहीत. या देशात मोहम्मद बीन कासिम याने प्रथम पाऊल ठेवत सिंधच्या दहिर राजचा पराभव केला, तेंव्हापासून ह्या निरंतर युद्धाला सुरुवात झाली आहे. या निरंतर युद्धाचा अभ्यास काही ठरावीक राजांनीच केला होता. बाकी कुणालाच हे युद्ध स्वातंत्र्य पूर्व काळात कळाले नाही. स्वातंत्र्यानंतर तर धर्मनिरपेक्षता नावाची अफूची गोळी मात्र आम्हाला आमच्याच पुढाऱ्यांनी दिली की त्या नशेत राष्ट्र, सीमा संरक्षण, सैन्य युद्ध ह्या गोष्टी आम्हाला पाप, राष्ट्रद्रोह अशा वाटू लागल्या.
खरंतर आज सुशिक्षित मुस्लिम समाजापुढे मोठे आव्हान आहे की, आपल्या धार्मिक श्रद्धा ह्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ठेवू नये. धार्मिक विस्तारवादी भूमिकेतून निरपराध बळी जाणार असतील तर कुठलाच समूह हे दीर्घकाळ सहन करत नाही याचे उत्तम उदाहरण आजचे इस्रायल राष्ट्र हे आहे. छळाकडून बळा कडे समाज जातोच! त्यामुळे जिहादची संकल्पना त्याग करणे हे मुस्लिम नव युवकाने ठरवले पाहिजे, अन्यथा ती संकल्पना त्याग करण्यासाठी संघटित हिंदू समाजाला प्रयत्न करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही जिहादची प्रेरणा एखाद्या विशिष्ट भुभागतून आलेली नाही. ही प्रेरणा ज्याने या जगातल्या असंख्य संस्कृतीचा बळी घेतला, मानवी जीवन मूल्यांचा नाश केला, याचे मूळ ज्या विचारात आहे त्या विचारांशी लढायची तयारी आम्ही जोपर्यंत करत नाही तो पर्यंत आता आपण करत असलेली आदळआपट ही तात्कालिक ठरेल.
मुळात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरलो आहोत. संत गुरू गोविंदसिंग यांचे बलिदान विसरलो आहोत. आम्ही श्रद्धानंद यांचा झालेला खून विसरलो आहोत. आम्ही राणा प्रताप विसरलो आहोत. आम्ही पृथ्वीराज चौहान यांचा पराभव विसरलो आहोत. आम्ही महंमद गझनी विसरलो आहोत. आम्ही महमद घोरी विसरलो, आम्ही तैमूर लंग विसरलो. जेंव्हा एखादा समाज आपल्यावर आक्रमण करणारे आक्रमक विसरतो किंवा त्याला ते विसरण्यासाठी काही राजकीय शक्ती भाग पाडतात त्या समाजाच्या नशिबात “उरी” , “२६/११ चा हल्ला”, “पठाणकोट”, “कंदाहार” व नुकतेच घडलेले “पुलवामा” हे येणारच. चिरंतन मानवी मूल्यांच्या आधारावर उभी असलेली संस्कृती जपायची असेल तर वेळीच अशा घटनांचे आकलन नीट समजून घेतले किंवा केले पाहिजे.
मानवी वंशाच्या इतिहासात इथला चिरंतन हिंदू विचारच अशा एकांगी विचारांशी लढा देवू शकतो त्याला पराभूत करू शकतो पण अशा चिरंतन मानवी मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची ज्या हिंदू समाजावर नियतीने जी जबाबदारी दिली आहे तो समाजच विस्कळीत आहे. तोच असंघटित आहे. तो जाती मध्ये, संकुचित प्रांत वादात, राजकीय स्वार्थ यात अडकला आहे. आणि त्याच्या निसर्गदत्त जबाबदारी पासून परावृत्त करणारे राजकारणी हे राक्षसी विचाराच्या हातचे बाहुले बनले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज का यशस्वी ठरले ? कारण त्यांनी अफझलखान चांगला ओळखला. त्यांनी कपटी औरंगजेब चांगलाच ओळखला. त्यांनी हा आक्रमक गनीम माफी देण्याच्या लायकीचा नाही हे ओळखले म्हणून ते प्रतापराव गुजर यांच्यावर बेहलोल खानाला माफी दिली म्हणून संतापले. जशास तसे हा युद्धनितीतला महत्वाचा भाग त्यांना माहीत होता. पूर्वीचे हिंदू राजे बऱ्याच लढायांमध्ये हारायचे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते कमी ताकदीचे होते असे नाही. त्यांच्यामध्ये अफाट ताकद होती. परंतु ते सरळ मार्गाने विचार करायचे आणि म्हणून कपटाने त्यांचा वध व्हायचा. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले असे राजे झाले ज्यांनी श्रीकृष्णाचे धोरण आणि नीती वापरली. “चांगल्यास चांगले” आणि “कपटास कपटच” ! त्यामुळेच त्याची युद्धनीती यशस्वी ठरली.
कोणतेही युद्ध हे केवळ जमीन बळकवण्यासाठीच केले जाते असे नाही. काही युद्ध हे तुमच्या श्रद्धा दुखविण्यासाठी, तुमच्या माता – भगिनींनी अब्रू लुटण्यासाठी, तुमची मंदिरे, देवालये इ. उध्वस्त करण्यासाठी केली जातात. अशा कामांसाठी आलेली यवनांची टोळधाड महाराजांनी अचूक ओळखली होती म्हणून त्या टोळधाडीचा बंदोबस्त त्यांनी त्याच पद्धतीने केला. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि धार्मिक उन्माद याची बेमालूम सरमिसळ म्हणजे या टोळ धाडीचे आक्रमण. नैतिकता, मानवी मूल्ये ही भाषा ज्याला समजत नाही त्याला त्यांनी कधीही वापरली नाही. सूर्याजी पिसाळ जसे त्यांनी ओळखले तसे मिर्झाराजे जयसिंग यांच्या नैतिकतेला आवाहन सुद्धा केले.
परंतु भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत. आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही त्याचीच परिसीमा ठरली.
मन अस्वस्थ आणि उदास आहे. कदाचित देशाच्या इतिहासाला हा एक काळादिवस कलाटणी देवू शकतो, परंतु त्यासाठी गरज आहे संघटित जन शक्तीची. जर आम्ही समाज म्हणून योग्य बोध यातून घेतला तर आज ज्यांना हौतात्म्य आले, त्यांचे हौतात्म्य देशाच्या कामी आले असे म्हणता येईल. नाही तर या मातृभूमीला विचारावे लागेल की, अजुन किती जणांचा बळी द्यावा लागणार आहे ? अजुन किती शुर जवान पत्नींना वैधव्य पत्करावे लागणार आहे ? किती निरागस मुलांना अनाथ व्हावे लागणार आहे ? मातृभूमी आज आक्रंदत असेल ? ह्या आक्रंदनातून आमचा निद्रिस्त समाज जागा होईल का ? हे निरंतर युद्ध नेमके समजून घेईल का? सरकार तर आहेच पण जागरुक संघटित समाजच हे निरंतर युद्ध थांबवू शकतो ! यापुढे फक्त आशा करूया की, याची सुरुवात आजपासून होईल!
— डॉ. शांताराम कारंडे
Leave a Reply