नवीन लेखन...

भाजीचं नेमकं वजन तराजूने मोजता येतं का?

फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे. वजनाला कमी असलेला कापसाचा ढीग, तेवढ्याच आकारमानाच्या गव्हाच्या बदल्यात दिला तर गहू देणाऱ्याला नुकसान सोसावे लागे. कारण कापसाच्या आकाराएवढ्या गव्हाच्या राशीचं वजन, कापसापेक्षा जास्त असते म्हणून आकारापेक्षा, वजनांची तुलना ही अधिक व्यवहार्य ठरली. मग तुलेचा किंवा तराजूचा उपयोग करुन वस्तूंची देवाणघेवाण व्हायला लागली.

समजा तराजूच्या एका पारड्यात गहू भरले आणि दुसऱ्या पारड्यात कापूस! दोन्ही पारडी तोलली गेली यावरुन आपल्याला गहू आणि कापूस एकाच वजनाचे आहेत हे समजलं, पण त्यांचं नेमकं वजन कळलं नाही. त्यासाठी आपल्याला तराजूच्या एका पारड्यात वस्तू आणि दुसऱ्या पारड्यात वजनाचं माप घालावं

लागेल. आपण बाजारात वाणी सामान किंवा भाजी आणायला जातो. अत्यंत सुजाण ग्राहक असल्यामुळे भाजीवाला भाजीचं वजन करतांना आपण बारीक लक्ष ठेवतो. त्याने एका पारड्यात वांगी घातली, दुसऱ्या पारड्यात आपल्या सूचनेप्रमाणे अर्धा किलो वजन ठेवलं, हे आपण नीट पहातो. आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी भाजीवाल्याला, भैय्या ठीक तरहसे वजन करो, काटा ढकेलो मत, अशी विनाकारण हिंदी भाषेतून सूचना देतो. मग त्याने वजन केलेली वांगी नक्की अर्ध्या “किलोची आहेत, याची खात्री

पटल्यावर मोठ्या समाधानाने वांगी आपल्या पिशवीत घेतो. खरचं त्या वांग्यांचं वजन अर्धा किलो

असेल? भाजीवाल्याने अर्ध्या किलोचं जे माप वापरलं त्याचे वजन अर्धा किलोच असेल, हे कशावरुन? समजा ते वजन ४५० ग्रॅम असेल आणि त्याच्यावर ५०० ग्रॅम असं नोंदलं असेल तर कळणार कसं? आपण थोडेच वजनाचं माप दुसऱ्या मापाबरोबर तोलून बघतो? खरचं भाजीचं नेमकं वजन तराजूने मोजता येतं का?

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..