नवीन लेखन...

डोकेदुखीवर मात कशी कराल

सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखीचा… डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी डोकं दुखण्याची तक्रार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जगातील ५० टक्के लोकांचे वर्षभरात एकदा का होईना डोकं दुखतंच, असं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्वेक्षण सांगतं. कुठल्याही वंशाच्या, कोणत्याही वयाच्या, स्त्री किंवा पुरुषांमध्ये ही लक्षणं आढळतात.सतत विचार करणं, मानसिक तणाव, गोंगाट, वातावरणातील प्रदूषण आणि धूर, खूप वाचन, टीव्ही-कम्प्युटरमुळे डोळ्यांवर येणारा ताण किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने असं तणावपूर्ण डोकं दुखतं.

Image result for डोके दुखी

डोकेदुखीवर घरगुती उपाय

  • आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.
  • प्राथमिक प्रकारच्या डोकेदुखीचं निदान, डोकं दुखण्याची जागा, वेळा, प्रकाश सहन होणं न होणं, मळमळ-उलटी होणं यावरून डॉक्टरांना समजू शकते. पण आजारांशी निगडीत डोकेदुखीकरिता एक्सरे, सिटी स्कॅन, एमआरआय, मेंदूचा आलेख अशा गोष्टीत होते. खूप दमल्याने, प्रवासाचा किंवा कामाचा शीण आल्याने, थंडीत बाहेर जाऊन आल्यानेसुद्धा डोकं दुखतं. मात्र डोकेदुखीच्या एकून उपचाराबाबत ५० टक्क्याहून जास्त लोक परस्पर दुकानातून वेदनाशामक गोळ्या घेतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. पण डोकेदुखीची इतकी विविध कारणं लक्षात घेतली, तर योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन आजाराचे निदान करून त्यावर उपचार करणंच योग्य ठरतं.
  • शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी पिऊनसुद्धा डोकेदुखीवर मात करता येते.
  • वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळे डोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.
  • कामाच्या दरम्यान डोकेदुखी उद्भवते तेव्हा बरेच लोक याकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करतात आणि संध्याकाळपर्यंत सर्व काही संपुष्टात येईल याची खात्री करून घेत त्याकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर विश्रांती दरम्यान संवेदना चालू राहिल्या तर, त्या व्यक्तीने त्याच्या प्रथम-औषधांच्या किटमधून येणारे प्रथम पेनकिलर घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त उचित ठरेल.
  • शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (ऍसिडचे) प्रमाण संतुलित होतं.
  • ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात किंवा मोकळ्या स्वच्छ ठिकाणी एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते. दीर्घ श्वास घ्या. तुम्ही आपल्या श्वासवर लक्ष केंद्रीत करा. तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो. शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मनाला शांतता वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. नेहमी दीर्घ श्वास आत घेण्याची अंगी लावून घ्या. त्यामुळे याचा तणाव आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

डोकेदुखीचे नेमके कारण समजण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तणावाला सामोरे जात असाल तर त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. बाजारात डोकेदुखीवर अनेक औषधे उपलब्ध आहेत परंतु, डाँक्टरांच्या सल्ल्यानेच ती घ्या.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..