नवीन लेखन...

नळ का गळतो आणि कसा थांबवायचा?

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो.

फिरकीच्या नळाचे तीन प्रमुख भाग लक्षात घेऊया. वरचा दर्शनी, म्हणजे जो आपण नेहमी वापरतो तो भाग; आपल्याला न दिसणारा नळाच्या दांड्याच्या खालच्या भागात असलेला स्क्रूसारखा भाग आणि त्याच्याखाली असलेली रबरी किंवा मऊ प्लास्टिकची चकती म्हणजेच वॉशर! आपण नळ फिरवून बंद करतो तेव्हा हा वॉशर, पाईप आणि तोटी यांना जोडणाऱ्या सांध्यावर दाबला जातो. लवचिक असल्यामुळे तो या सांध्यावर अशा पध्दतीने विसावतो की पाईपमधलं पाणी तोटीपर्यंत जाऊ शकत नाही. आपण पाणी सोडण्यासाठी नळ फिरवतो तेव्हा नळ वर उचलला जातो. नळाच्या दांड्याबरोबर वॉशरही वर जातो आणि उचलला पाईपमधल्या पाण्याला तोटीकडे जाण्याची वाट मोकळी करुन देतो. नळ बंद करतांना वॉशर सतत दाबला जाऊन सैल पडतो.

मग तो पाईप आणि तोटीच्या सांध्यावर नीट बसत नाही. हळूहळू नळ गळायला सुरूवात होते. मग आपण जास्तच जोराने फिरकी फिरवायला लागतो. परिणामी वॉशर आणखी सैल होतो आणि मग गळणारं पाणी थांबवणं आपल्या आवाक्याबाहेर जातं.. आपण प्लंबरचा धावा करायला लागतो.

समजा, नुकताच नळ सुरूवात झाली आपण स्वतःच गळायला असतांना नळावरचा स्क्रू काढून नळ काढला आणि त्याचा सैल झालेला वॉशर काढून त्या जागी दुसरा वॉशर बसवला तर? असं करता यायला हरकत नाही. फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे नळ काढून वॉशर बदलत असतांना घराला जोडणारा पाण्याचा मुख्य नळ बंद करावा लागेल आणि बाजारातून आधीच नवीन वॉशर आणून ठेवावा लागेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..