लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा.
चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या महिन्यापासून बाळाला दात येण्यास सुरुवात होते.
सहाव्या वर्षी मुलाला पहिली कायमस्वरूपी परमनंट दाढ येते. १२-१३ वर्षांपर्यंत दुधाचे दात तोंडात राहतात. वयाच्या दहाव्या वर्षी दुधाचे आणि काही कायमस्वरूपी दात मुलाच्या जबड्यात असू शकतात. याला ‘मिक्सीड डेंण्टीशन’ असे म्हणतात. १४ वर्षानंतर मुलाला रेग्युलर कायमस्वरूपी दात यायला सुरुवात होते. कायमस्वरूपी दातांची ठेवण ही बरीचशी दुधाच्या दातांच्या . ठेवणीवर अवलंबून असते. उदा. ठराविक वेळेत प्राथमिक दात येणे, ठराविक काळापर्यंत जबड्यात राहणे आणि ठरलेल्या वेळात दात पडणे हे त्यावर अवलंबून असते. दुधाचे दात वेळेवर आले नाहीत किंवा वेळेवर पडले नाहीत तर जबड्याची रचना आणि कायमच्या दातांची ठेवण वेडीवाकडी होऊ शकते. दुधाच्या दातांच्या काळजीकडे दुर्लक्ष करता कामा नये. लहान मुलांच्या दातांमध्ये आढळणारा सर्वसामान्य रोग म्हणजे रॅम्पंट केरीज अथवा दंतक्षय. यामध्ये सगळे दात किडतात, तुटतात आणि वेळेच्या आधीच पडतात. अशा दातांवर वेळीच उपचार केला पाहिजे. आहार आणि खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण आणले पाहिजे.
कॅलशियमयुक्त आहार देणे महत्त्वाचे आहे. रात्री झोपताना बऱ्याच मुलांना तोंडात दुधाची बाटली घेऊन झोपायची सवय असते. हे दूध मुलाच्या दातांमध्ये जास्त वेळ साठून राहिल्याने दात लवकर किडायला लागतात. याला ‘मिल्क बॉटल सिंड्रोम’ असे म्हणतात. पालकांनी लहान मुलांचे दात साफ ठेवण्याकरिता कापसाचा बोळा किंवा स्वच्छ कपड्याचा वापर करावा. हलक्या बोटाने हिरड्या व जीभदेखील साफ करणं आवश्यक असतं.
डॉ. श्वेता खेर
मराठी विज्ञान परीषद
Leave a Reply