शहरात राहणारा राज नावाचा मुलगा गावी गेला आणि त्याने एका म्हाताऱ्या शेतकऱ्यांकडूनहजार रूपयांना एक गाढव विकत घेतले. पण दुसऱ्याच दिवशी शेतकरी गाडीने राजकडेआला आणि म्हणाला, माफ करा राजजी, पण माझ्याकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.मी तुम्ही विकत घेतलेल्या गाढवाला इथे आणताना ते रस्त्यातच मेले.
राजम्हणाला- बरंमग, मला माझे पैसे परत करा.
शेतकरी म्हणाला – माफ करा, मी नाही करू शकत परत, कारण माझ्याकडून ते सर्व पैस खर्च झाले.
राज (विचार करत) म्हणाला- ठीक आहे, त्या गाढवाला गाडीतून बाहेर काढा.
शेतकरी- पण तुम्ही त्या मेलेल्या गाढवाचे काय करणार?
राज-मी त्याला लॉटरी पध्दतीने बाजारात विकेन.
शेतकरी- पण मेलेले गाढव तुम्ही कसे काय विकणार?
राज- नक्कीच मी करू शकतो, बघा तुम्ही. मी कुणाला सांगणार नाही की ते गाढव मेले आहे.
एका महिन्यानंतर राज त्या शेतकऱ्याला भेटला. शेतकऱ्याने विचारले त्या गाढवाचे काय झाले?
राज – मी त्याला लिलाव करून विकलं. मी १० रू लॉटरीपध्दतीने ५०० तिकिटे विकली आणि गाढव हजार रूपयाला बक्षीस म्हणून लावून ४९९०रू नफा कमावला.
शेतकरी- कोणी तक्रार नाही केली?
राज-केली ना, ज्याने ते विकत घेतलं त्याने तक्रार केली. मग मी त्याचे १० रू परत दिले.
शिकवण- अशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका.
संकलन – अमोल सातपुते
Leave a Reply