उठ गं बये रडतेस काय
रोजचाच मार हा सहतेस काय
कुणीच नाही येणार अश्रू पुसायला
तूझेच तूला टिपायचेत, मग थांबव कि स्वतःला
उठ गं बये तुझंच राज्य
तुझ्याच घरात तुलाच सारे त्याज्य
बसूदे चटके, उठूदे वळ
दिवसाअखेर संपते गात्रातले बळ
उंबरठ्याच्या आत राहील हे सारं
संस्कारांना माती देऊन, नाही बाहेर कुणी बोलणारं
ओढायचाय गाडा, एकटीच्याचं चाकावर
मग कशाला आसूड ओढतेस, स्वतःच्याचं पाठीवर
संपव हे हुंदके नि थांबव हे पाट
पदर बांधून हो पुढे, आता परतीची नाही वाट..
— वर्षा कदम.
Leave a Reply