आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहे. ह्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले जातात पण काही वेळा असाही अनुभव येतो की खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते. वजन कमी करण्यासाठी आपण काय करत आहोत? तर आपल्याच लक्षात येईल की ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सर्व आपण करत आहेत. पण तरीसुद्धा फारसा फरक जाणवत नाही. त्याचे कारण म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपण खूपच साध्या गोष्टींचे पालन करण्यात कुठेतरी कमी पडतो.
प्रोटीन्स कमी प्रमाणात घेणे-
आपल्या शारीरिक विकासासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळणे खूपच आवश्यक आहे. खासकरून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हाडे मजबूत होऊन अतिरिक्त फॅटपासून सुटका होण्यास मदत होते.
फळे कमी खाणे-
फळात नैसर्गिक स्वरुपात साखर असते हे सामान्य ज्ञान सर्वानांच आहे पण तरीसुद्धा अनेक लोक फळे खाणे टाळतात. फळांमध्ये अनेक प्रकारचे शरीराला पोषक असे घटक असतात. पण ह्याकडे नकळत दुर्लक्ष्य होते. फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी खूपच उपयुक्त असतात. साहजिकच कोणती फळे खावीत हे तुम्ही तज्ज्ञांकडून जाणून घ्या आणि त्याप्रमाणे फळे खा.
झोप कमी घेणे-
दिवसभराच्या कामामुळे आपण जर कमी झोप घेत असाल तर ते शक्यतो टाळा कारण झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होवून मेटॉबॉलिझम कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.
नियमित व्यायाम-
जर आपल्याला व्यायामाचा शरीरावर योग्य परिणाम व्हावा असे वाटत असल्यास वेळोवेळी व्यायामप्रकारात तज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.
Leave a Reply